कुरकुंभ येथील नेत्रतपासणी शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २३ रुग्ण पात्र
By : Polticalface Team ,Sun Jul 17 2022 19:15:06 GMT+0530 (India Standard Time)
कुरकुंभ ता .दौंड :
१६ जुलै २०२२
लोकनायक मा .राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फिरगांई विद्यालय कुरकुंभ येथे मोफत नेत्र तपासणी आणि शस्रक्रिया शिबीर पार पडले.
या शिबिरात ५९ रुग्णांनी सहभाग नोंदविला .
मोतीबिंद शस्त्रक्रियासाठी रुग्णांना पात्र करण्यात आले .
१९ रुग्णांना मोफत नंबरचे चव्मे वाटप करण्पात आले.
बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे रुग्णांची विनाशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .यावेळी
प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे - देशमुख ,
कुरकुंभचे उपसरपंच विनोदजी शितोळे ,बुधराणीचे डॉ .गिरीश पाटील ,डॉ.आप्पासाहेब काळे, भापकर सर ,गणेश वाघमारे भरत मोरे , सागर मोरे उपस्थित होते .दिव्य समाज निर्माण संस्थेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील आजपर्यंत हजारो रुग्णांच्या शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे यशस्वी झाल्या आहेत .
वाचक क्रमांक :