दलित अत्याचार कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल कोळगाव येथील घटना.
By : Polticalface Team ,Mon Jul 18 2022 20:25:43 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 5 जुलै 2022 रोजी झालेल्या मागासवर्गीय तरुणाच्या अर्धनग्न धिंड व जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी यातील कायदा हातात घेणाऱ्या आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट (Atrocity Act) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, दिनांक 5 जुलै 2022 रोजी चर्मकार मागासवर्गीय समाजाच्या एका तरुणाला जमावाने पकडून त्याचे मुंडण करून जातिवाचक शिवीगाळ करत, अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली होती. या प्रकरणी video clip च्या आधारे दिनांक 11 जुलै 2022 रोजी दोन समाजात शत्रुत्व वाढवण्याच्या दृष्टीने व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असंविधानिक जमाव जमवून जातीवाचक बोलणे या कलमान्वये नमूद आरोपींवर पोलीसांनी फिर्यादी होत गुन्हे दाखल केले होते.
दिनांक 13 जुलै 2022 रोजी पीडिताच्या वडीलांचे व भावाचे पोलिसांनी जबाब नोंदविले. दिलेल्या जबाबानुसार Atrocity चे वाढीव कलमं नोंद करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात Atrocity च्या 3(1)(R)(S), 3(D), 3(I) व 3(2)(va) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये दिसणारांपैकी समोरील 4 जणांसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अतिरिक्त 3 व इतर 15 ते 20 लोकांवर नमूद गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली psi चाटे करीत आहेत.. viral Video clip आधारे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.. वर्तवण्यात येत आहे..
वाचक क्रमांक :