कोळाईदेवी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अमित लगड

By : Polticalface Team ,Tue Jul 19 2022 17:44:56 GMT+0530 (India Standard Time)

कोळाईदेवी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अमित लगड श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी माध्यमिक विद्यालयात बुधवार १३ जुलै रोजी भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यामुळे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येऊन अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते माजी उपसरपंच अमित लगड यांच्या नावाला पसंती देण्यात आली तर उपाध्यक्ष पदी अविनाश निंभोरे यांची निवड करण्यात आली. या पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे सदस्य नागवडे कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे हे होते. त्यांनी शाळेच्या विकासाबाबत व शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. कोरोनाच्या संकटानंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून दरम्यानच्या काळात शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यकाळ संपून वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटल्याने श्री. कोळाईदेवी महाविद्यालयाचे प्राचार्य दांगडे सर यांनी पालक मेळाव्याचे आयोजन करत पालक मेळाव्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीत बरोबरच , परिवहन समिती, शाळा विकास समिती, शालेय पोषण आहार समिती, माता पालक समिती यासह इतर समित्यांचे शाळेच्या गुणवत्तापूर्ण तसेच इतर सर्व योगदानविषयी माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य जंगले सर यांनी सर्व समित्यांची रचना व कार्यपद्धती विषद करत सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदासाठी माजी उपसरपंच अमित लगड यांच्या नावाची सूचना अविनाश निंभोरे यांनी केली असता सर्वांनी त्याला अनुमती देत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी अविनाश निंभोरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आल्या. यावेळी सर्व पालकांनी शाळेच्या गुणवत्ता बाबत सूचना करत शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी करण्यात यावी, तसेच शाळा आत्ता पूर्णवेळ भरत असल्याने शाळेचा अभ्यास मोबाईल देऊ नये, शाळेच्या स्वच्छता गृहाची स्वच्छता नियमित करण्याच्या सूचना देत शिक्षकांनी मुलांसाठी स्पर्धा परीक्षाचे आयोजन करून तशी तयारी करून घ्यावी, सी बी एस ई पैटर्न प्रमाणे एका वर्गाची सुरुवात करण्याची सूचना करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी भरीव योगदान देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि नवीन निवड झालेल्या शा.व्य. समितीला पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कोळगावचे माजी उपसरपंच नितीन नलगे, अमोल काळे, संतोष मेहेत्रे, नागेश लगड, अविनाश पवार यांच्यासह पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळे सर सूत्रसंचालन श्रीमती धिवर यांनी तर आभार प्राचार्य दांगडे एच के केले.
लवकरच नवीन समितीची बैठक बोलावून शाळेचा पुढील पाच वर्षाच्या विकास आराखड्याबाबत चर्चा करून तो बनविण्यात येणार असून शाळेच्या भौतिक विकासाबरोबरच मुलांसाठी शहरातील शाळांच्या तुलनेत विविध उपक्रम राबवत शाळेला शाळेचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शाळेच्या क्रीडांगणासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगत पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन दोन्ही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे अमित लगड यांनी बोलताना सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी