उजनी जलाशयात सापडला 15 किलोचा कटला जातीचा मोठा मासा
By : Polticalface Team ,Wed Jul 20 2022 21:15:38 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनीधी
उजनी जलाशयात मासेमारी करत असताना सोगाव पूर्व ता. करमाळा येथील मानसिंग नगरे या मच्छिमाराला मंगळवार दि.१९ रोजी सकाळी उजनी जलाशयात मासेमारी करत असताना १५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा जाळ्यात सापडला.
एवढ्या वजनाचा मासा सापडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच माशाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.हा मासा परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रतिकिलो २०० रुपये प्रमाणे खरेदी केलाअसता एका माशाचे तीन हजार रुपये मिळाले.
मागील आठ दिवसापासून ऊजनी जलाशयातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने मासे सापडण्याचे प्रमाण अधिक आहे.कटला जातीचा मासा गोड्या पाण्यात राहणारा असून वाहत्या पाण्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनें प्रवास करतो.
सध्या भिमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर चिलापी जातीचेच मासे सापडतात. कटला, रहु, वाम्ब, मरळ या जातीच्या माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या माशांना सध्या भाव अधिक आहे.
वाचक क्रमांक :