ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे म्हणून उठविलेला आवाज शासन स्तरावर पोचल्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न अखेर मिटला : माजी आमदार नारायण आबा पाटील शिंदे

By : Polticalface Team ,Thu Jul 21 2022 13:58:31 GMT+0530 (India Standard Time)

ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे म्हणून उठविलेला आवाज शासन स्तरावर पोचल्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न अखेर मिटला : माजी आमदार नारायण आबा पाटील शिंदे करमाळा( प्रतिनीधी अलीम शेख मो 9850686360): ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे म्हणून उठवलेला आवाज शासनस्तरावर पोहचल्यामुळेच हा प्रश्न सुटला असून शिंदे-फडणवीस सरकारचे आपण अभिनंदन करत आहेत असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की ओबीसींना राजकीय आरक्षणापासून सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिले असले तरी हा निर्णय थेट जनविकासावर परिणाम करणारा असाच होता. काही अपवादात्मक ठिकाणी आरक्षणाच्या नियमीत टक्केवारीचे उल्लंघण झाले असले म्हणून संपुर्ण ओबीसी समाजास राजकीय आरक्षणापासून वंचीत ठेवणे ही बाब अन्यायकारक होती. यामुळेच आपण दिनांक 20 जून 2022 रोजी करमाळा तहसिलकार्यालयात करमाळा मतदार संघातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या सर्व जातीच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बरोबर घेऊन मा. तहसिलदार समीर माने यांना एक निवेदन सादर करून ओबीसी आरक्षण सुटणे कितपत गरजेचे आहे हे निवेदन व चर्चा याद्वारे सांगितले.ओबीसी राजकीय आरक्षणास पुरक अशा इंपरीयल डाटा संकलित करताना काही त्रुटी आढळून आल्याचे मा तहसिलदार यांचे निदर्शनास आणून दिले. या निवेदनाच्या प्रति तत्कालीन मुख्यमंत्री,विरोधीपक्षनेते  तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या होत्या. तसेच जर हा प्रश्न न। सुटता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत व वेळप्रसंगी आपण या प्रश्नावर उतरुन आंदोलन करण्याचाही निर्धार पक्का केला होता. परंतु सत्तांतरानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  भेटी घेऊन या प्रश्नाबाबत करमाळा मतदार संघातील तमाम ओबीसी बांधवांच्या भावना काय आहेत हे सांगितले होते. आता राज्यपातळीवरुन हा मोठा प्रश्न सुटल्याचे समाधान वाटत असून ओबीसी समाज हा राजकीय प्रवाहात राहील्याने सर्वांगीण व समान विकासास चालना अगदी ग्रामपंचायत स्तरापासून बळ मिळणार आहे. ओबीसी समाजाच्या या आरक्षण प्रश्नावर आवाज उठवताना करमाळा मतदार संघातील विविध जात संघटना, आजी माजी पदाधिकारी व विविध पक्ष यांनी मला पाठींबा दिला होता यामुळेच आज हे श्रेय या सर्वाच्या एकतेचे असून आगामीकाळातही ओबीसी समाजाच्या पाठीशी आपण भक्कम पणे उभे राहून त्यांच्या सर्व सामाजिक व विकासात्मक प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी