जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी दि. २५/०७/२०२२ पर्यंत आपला तक्रार अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा-तहसिलदार श्रीगोंदा
By : Polticalface Team ,Thu Jul 21 2022 19:31:19 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 20-07-2022
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादया दि. २०/०७/२०२२ रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा व पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
तरी ज्या नागरीकांना मतदार यादया पहायच्या असतील त्यांना पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा, तहसिल कार्यालय श्रीगोंदा व संबधीत ग्रामपंचायत कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व ज्यांना मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी दि. २५/०७/२०२२ पर्यंत आपला तक्रार अर्ज तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावा. दि. २५/०७/२०२२ नंतर आलेला तक्रार अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. याची तालूक्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.
वाचक क्रमांक :