ओबीसी बांधवांना आरक्षण मिळाल्यामुळे, श्रेयवादाच्या बांडगुळांचा सुळसळाट-दशरथ (आण्णा) कांबळे
By : Polticalface Team ,Fri Jul 22 2022 10:50:14 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा-प्रतिनिधी
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी सकल ओबीसी बांधवांच्या वतीने सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांना घेऊन, तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ओबीसी बांधवांची जनजागृती करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन आंदोलने, मोर्चे अथवा एखादा शासन प्रशासन यांना इशारा देणे. ह्या सर्व गोष्टी योग्य दिशेने घेऊन जाण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. हे सर्व करत असताना आम्ही कधीही श्रेयवाद, राजकीय, सामाजिक अथवा कोणतेही महत्त्वाकांक्षी विचार न करता, फक्त आणि फक्त ओबीसी बांधवांना न्याय मिळावा. हाच एकमेव उद्देश ठेवून लढा दिला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क अधिकार मिळावे, यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा ज्या-ज्यावेळी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी जात होतो. त्यावेळेस ओबीसी बांधवांना आम्ही एवढेच सांगत होतो की, त्यावेळेस ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी बाबासाहेब होते. परंतु जर तुम्ही तुमच्या हक्क अधिकारासाठी आत्ता जागृत नाही झाला. तर परत तुम्हाला जागृत करण्यासाठी किंवा तुमचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेब येणार नाहीत. या आमच्या सर्व विचारांवर ओबीसी बांधवही एकवटत चालला होता. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुध्दा प्रा. शिवाजीराव बंडगर, दत्तात्रय अडसुळ, प्रशांत शिंदे, गणेश चिवटे, शितल क्षिरसागर, पत्रकार जयंत दळवी, नारायण पवार, कुंभार, किरण बोकन, विनोद महानवर, दराडे गुरुजी, निळकंठ अभंग, भर्तरीनाथ अभंग, सुभाष जाधव या ओबीसी नेत्यांना घेऊन आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाज बांधवांपर्यंत दररोज भटकंती करत होतो. आमचा फक्त या ठिकाणी एवढाच शुद्ध हेतु होता की, ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही मोर्चे, आंदोलने, धरणे प्रदर्शन, निवेदने या सर्वच गोष्टींचा पर्याय अवलंबला होता. या सर्व बाबीतुन सरकारवर दबावतंत्राचा वापर करुन ओबीसी बांधवांचे अधिकार प्राप्त करुन घेणे. परंतु कोरोनासारख्या महामारीमुळे आम्हाला आमच्या आंदोलनांची दिशा नेहमी बदलावी लागली. परंतु जागृतीचा अग्नी आम्ही कधी हि थंड होऊ दिला नाही.
या ठिकाणी आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ओबीसींना आरक्षण मिळाले आहे. त्याबद्दल विविध पक्षाचे राजकीय नेते अभिनंदन करत आहेत. परंतु ओबीसींना खरोखरच राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी कोणताही राजकीय पक्ष प्रभावीपणे काम करत नव्हता. फक्त चर्चा आणि आश्वासने एवढेच जनतेला प्रत्येकजन देत होता. परंतु जसा-जसा जनरेटा वाढत गेला, तसा-तसा सरकारवर दबावही मोठ्या प्रमाणात पडला. आम्हाला या ठिकाणी एवढेच सांगायचे आहे की, ज्याप्रमाणे बांडगुळ हे दुसऱ्याच्या जीवावर जगते. त्याप्रमाणे कोणतेही समाजासाठी चांगल्या हिताचे कार्य झाले की, राजकीय बांडगुळ सक्रिय होतात. व मोठे-मोठे बॅनर लावणे, घोषणा देणे व आनंदोत्सव साजरा करणे. व सर्व समाज बांधवांना ओरडून सांगणे कि, "मुझे गिनो"....ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण मिळाले. हे सर्व श्रेय त्या लढवय्या समाज बांधवांचे आहे. ज्यांनी ओबीसी समाज बांधवांना एकसंध ठेवून त्यांची वज्रमूठ तयार केली. व सरकारलाही झुकायला लावले. अशा सर्व परिश्रम घेतलेल्या समाज बांधव व जागृतीचा विस्तव तेवत ठेवणाऱ्या, या सर्व योद्यांचे हे श्रेय आहे. समाजाची जागृती करण्यासाठी पुढाकार घ्या. असे म्हटले असता, कोरोनाची कारणे पुढे करुन, कधीच समाजाला जागृतीच्या दोन गोष्टी सांगितल्या नाहीत. परंतु घरामध्ये बसुन "नथी मधून तीर मारणाऱ्या" बहाद्दरांना आम्ही एवढेच सांगू की, सत्ता ही येत असते-जात असते. परंतु समाजासाठी कोणत्या व्यक्तींनी योगदान दिले हे समाज सताड उघड्या डोळ्यांनी पहात असतो. फुकटच्या श्रेयवादासाठी व राजकारणामध्ये चमकण्यासाठी चुकीच्या बातम्या देऊन, ओबीसी अथवा इतर समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. कोणता ही समाजावर अथवा समाजबांधवावर अन्याय, अत्याचार झाला. तर अशा सर्वांसाठी आमची दारे नेहमी उघडी असतील. व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची भुमिका नेहमी अग्रेसर असेल हे मात्र नक्की!!!! सध्यातरी ओबीसी बांधवांना राजकिय आरक्षण मिळवुन देण्याकामी, महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालय यांचे शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आभार व ओबीसी बांधवांना पुढील राजकिय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष