लहुजी शक्ती सेनेचा आंदोलनाचा इशारा,हतबल पारनेर प्रशासन , लोखंडी जाळी लावून बंदिस्त अलभर कुटुंबाचा रस्ता मोकळा...

By : Polticalface Team ,Fri Jul 22 2022 10:56:54 GMT+0530 (India Standard Time)

लहुजी शक्ती सेनेचा आंदोलनाचा इशारा,हतबल पारनेर प्रशासन , लोखंडी जाळी लावून बंदिस्त अलभर कुटुंबाचा रस्ता मोकळा... पारनेर प्रतिनिधी :- गेली पाच दिवसापासून बबन अलभर यांच्या घरासमोर काही समाज कंटकांनी जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी जाळी लावून त्यांचे कुटुंबीयांना बंदिस्त केले होते. याबाबत पिडीत बबन अलभर यांनी पारनेर पोलिस स्टेशन , तहसीलदार , गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन बंदिस्त कुटुंबाला मोकळे करण्याची याचना केली होती . या प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवत या कुटुंबाला वेठीस धरले .ही गंभीर बाब विचारात घेऊन लहुजी शक्ती सेनेने बेमुदत थाळीनाद आंदोलनाचा इशारा देताच पारनेर प्रशासन हतबल झाले आणी तात्काळ रस्त्यामधली जाळी हटवून बंदिस्त कुटुंबाचा रस्ता मोकळा करण्यात आला . सविस्तर वृत्त आसे की... पारनेर तालुक्यातील यादववाडी येथील अलभवरवाडी या ठिकाणील बबन बन्शी अलभर यांच्या 17 जुलै रोजी या कुटुंबाला काही विघ्न संतोषी लोकांनी घरासमोरील रहदारीच्या रस्त्यावर लोखंडी जाळी मारून रस्ता बंद केला होता. संबंधित कुटुंबाला घराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे ते कुटुंब 17 जुलैपासून घरांमध्ये बंदिस्त होते. अलभर यांची मुलगी शिरूर येथे विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे तिची 25 जुलैपासून परीक्षा आहे. मुलगा वाडेगव्हाण येथे इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका असून त्यांनाही अंगणवाडीत जाता येत नव्हते . त्यांची मानसिकता खचलेली होती. संपूर्ण कुटुंब भयभित झालेले आहे अशा आशयाचे निवेदन लहुजी शक्ती सेना यांनी पारनेर पोलीस प्रशासन, तहसीलदार,गटविकास अधिकारी पारनेर,यांना दिले होते. या निवेदनात म्हणले होते की या कुटुंबाची प्रशासनाने दखल न घेतल्यास प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कुटुंबाची सुटका करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तहसील कार्यालय पारनेर यासमोर 21 जुलै रोजी बेमुदत थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. लहुजी शक्ती सेनेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठी यांनी कामगार तलाठी, ग्रामसेवक यांना घटनास्थळी पाठवून रस्ता बंदिस्त केलेली जाळी काढून टाकण्यात आली. परंतु सामोरील रस्त्यावर जाळी टाकणाऱ्या व्यक्तींना प्रसार माध्यमांनी विचारपूस केली असता बबन अलभर हेही आमच्या रस्त्याची अडवणूक करीत आहे असे त्यांनी सांगितले आहे.आणि बबन अलभर त्यांच्या कंपाउंडची भिंत पाडण्याचा आग्रह धरला . या निषेधार्थ लहुजी शक्ती सेना यांनी आलभर पीडित कुटुंबाला घेत पारनेर पंचायत समिती येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व पारनेर चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार घालून शांततेच्या मार्गाने तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत निषेध व्यक्त केला . परंतु तहसील कार्यालया वरती मोर्चा का आणला म्हणून तहसीलदार शिवकुमार आवळकंठी यांनी लहुजी शक्ती सेना पदाधिकारी यांना व बबन आलभर यांना आरेवारीची भाषा करत कार्यालयाच्या बाहेर काढण्याचा निंदनीय प्रकार घडला परंतु पत्रकारांनी मध्यस्थी करत सदरील प्रकारावरती सध्या तरी पडदा टाकण्यात आला. जर तहसीलदार यांनी या प्रकाराला कर्तव्यदक्षतेने हाताळले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता याठिकाणी कर्तव्यात कसूर करून कायदा सुव्यवस्था बिघाडन्याची पूरक तयारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठी यांनी केल्याचे पत्रकारांना जाणवले . परंतु लहुजी शक्ती सेना व पदाधिकारी यांना तहसीलदार यांनी खालच्या भाषेमध्ये बोलल्यामुळे व अपमानात्मक वागणूक दिल्यामुळे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठी यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे लहुजी शक्ती सेनेचे शिरूर शहर अध्यक्ष विशाल जोगदंड व श्रीगोंदा विधानसभा तालुका अध्यक्ष संदीप अवचिते तसेच लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे. सामनेवाल्यांनी मला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास देवू नये.वेठीस धरू नये .माझ्याकडून कोणाला त्रास होत असेल किंवा अडवणूक होत असेल तर न्याईक मार्गाने जावे ,माझे जर अतिक्रमण असेल तर गावांतील सर्व अतिक्रमणे पहावीत.सर्वाची अतिक्रमणे हटत असतील तर माझेही अतिक्रमण हटवन्यास तयारी असल्याचे बबन अलभर यांनी सांगितले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.