अहमदनगरच्या “कुंकुमार्चन” या लघुपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
By : Polticalface Team ,Sat Jul 23 2022 19:24:42 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर : नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात अहमदनगर येथील अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित “कुंकुमार्चन” या लघुपटाला 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी भाषेतील नॉन-फिचर फिल्म श्रेणीत कुंकुमार्चन ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला. नाट्य, सिनेमा लेखक अभिजीत दळवी यांचे दिग्दर्शन, कौस्तुभ केळकर यांची कथा आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची निर्मिती असलेला हा लघुपट आहे.
“कुंकुमार्चन” हा लघुपट आई आणि दिव्यांग मुलाच्या जीवनावर आधारित आहे. अहमदनगरचे नाट्य सिनेमा लेखक श्री अभिजीत दळवी यांचं हे पहिलं दिग्दर्शन असून लघुपटाची मूळ कथा ही श्री कौस्तुभ केळकर यांची आहे. कथा विस्तार, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अभिजीत दळवी यांनी केले आहे. या लघुपटातून पुष्कर तांबोळी, प्रणित मेढे आणि अभिजीत दळवी यांनी निर्मितीचे पहिले पाऊल टाकले.
या लघुपटाची निर्मिती उत्तम होण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. या लघुपटाच्या प्रस्तुतीसाठी अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड इंटरटेनमेंटने काम पाहिले
वाचक क्रमांक :