श्रीगोंद्यातील विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर : पाचपुते
By : Polticalface Team ,Sun Jul 24 2022 11:45:31 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :शहर विकासासाठी श्रीगोंदे नगरपालिकेसाठी सर्वाधिक निधी आमदार पाचपुते यांनीच आणला. बाह्यवळण रस्ता, नळ योजना, १७ रस्ते, नाना नाणी पार्क आदी कामांना कोट्यवधींचा निधी आला. २०१४ ते २०१ ९ मध्ये भाजप सरकार असताना पाचपुते यांचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी कधी डाववला नाही. २०१९ नंतर भाजप सरकार गेले. श्रीगोंदा शहराला पाचपुते यांनी निधी कमी पडू दिला नाही.छाया गोरे भाजप गटनेत्या श्रीगोंदे नगरपरिषद, श्रीगोंदा शहरातील विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आपण या निधीची मागणी केली होती. त्यांच्या आदेशाने हा निधी नगरविकास खात्याने मंजूर केला, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार आ पाचपुते यांनी म्हटले आहे, श्रीगोंदा शहर विकासाचे नियोजन आपण केले होते. २०१९ च्या निवडणूकी नंतर या विकास कामांच्या नियोजनाला काही प्रमाणात खीळ बसली. नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासीयांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. ही जबाबदारी लक्षात घेता आपण मागील तीन वर्षांचा विकास कामांचा अनुशेष आता भरून काढणार आहे. गटनेत्या छायाताई गोरे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके व इतर नगरसेवकांची या बाबत बैठक घेऊन, शहरातील प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. त्यानुसार सविस्तर कामांची यादी मुख्यमंत्र्यांना देऊन ५ कोटी रुपयांची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने आदेश देत नगरविकास खात्याने हा निधी मंजूर केला आहे. ही कामे सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडे मागे आपण शहराच्या निधीसाठी मागणी केली होती. त्यावर निर्णय घेत १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. ते ही काम लवकर सुरू करण्यात येत असल्याचे पाचपुते यांनी म्हटले आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी