लोकमान्य टिळकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची अखंडपणे सेवा केली -प्रसिद्ध व्याख्याते अभिषेक उदमले

By : Polticalface Team ,Sun Jul 24 2022 18:49:31 GMT+0530 (India Standard Time)

लोकमान्य टिळकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची अखंडपणे सेवा केली -प्रसिद्ध व्याख्याते अभिषेक उदमले लिंपणगाव( प्रतिनिधी) लोकमान्य टिळकांनी देशाच्या उत्तम जडणघडणीसाठी मोठा संघर्ष व त्याग केला तसेच अखेरच्या श्वासापर्यंत भारत देशाची अखंडपणे सेवा केली . त्यांचे जयंती निमित्त स्मरण करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते अभिषेक उदमले यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे .श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 166 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी या महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते व ज्येष्ठ शिक्षक आनंदा पुराणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सस्ते हे होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्याख्याते श्री उदमले पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्या खेडेगावात जन्म झाला. लहानपणापासूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे करारी होते. प्रामाणिक होते. जिद्दी होते. आणि एखाद्या निर्णयावर ठाम राहायचे. बालपणी देशाविषयी अपर सहानुभूती प्रेम जिव्हाळा होता. असे सांगून श्री उदमले पुढे म्हणाले की, लहानपणी टिळकांना सहज गुरुजींनी विचारलं की, मोठे झाल्यानंतर तुम्हाला काय व्हायचे आहे. त्यावेळेस क्षणभराचा ही विलंब न करता टिळकांनी उत्तर दिलं मोठं झाल्यानंतर मी काय होईल9 हे आत्ता सांगणार नाही. परंतु भविष्यामध्ये मला शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करायची आहे. टिळकांच्या उत्तराने गुरुजी खूप प्रभावी झाले. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्यलढ्याविषयी जनजागृती करण्यासाठी टिळकांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले. व या वृत्तपत्रांमध्ये असलेल्या जहाल अग्रलेखामुळे लोक स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना त्यांनी अहमदनगरच्या भव्य सभेमध्ये केली होती. असे सांगून टिळकांच्या जीवन चरित्रावर श्री उदमले यांनी प्रकाश ज्योत टाकला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दत्तात्रेय सस्ते यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकमान्य टिळकांना लिखाणाची मोठी आवड होती, त्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर देशाच्या हितासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. पुढे पुढे त्यांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र काढले. त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाची संस्कृती, त्यातून देशाची प्रगती, व देशाच्या स्वातंत्र्यासाठी या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेला लोकमान्य टिळकांनी त्याकाळी मोठी दिशा दिली. देशाच्या जडणघडणीमध्ये टिळकांचे मोठे योगदान लाभले. असे सांगून ते पुढे म्हणाले की टिळकांच्या स्वप्नातला भारत आज संपूर्ण जगामध्ये सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगून त्यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त प्राचार्य सस्ते यांनी यावेळी अभिवादन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी मानले. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक ,माध्यमिक, महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळकांना 166 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंती दरम्यान विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी प्रबोधन करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष