श्रीगोंदा प्रतिनिधी : - श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला ग्रामपंचायतीचे ८ उमेदवार बिनविरोध झाले असुन एका जागेसाठी निवडणूक लागली आहे या जागेसाठी ४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत
९ जागेसाठी ४५ उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते अर्ज माघारीचा दिनांक २२ तारखेला शेवटचा दिवस होता या मुदतीत ४५ पैकी ३३ जणांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेतले बिनविरोध उमेदवार मोहनराव आढाव, ज्योती दिवटे, शोभा काळे, सुदाम सातव, शैनाज शेख, स्वाती चव्हाण, सुनिता सातव, सुभाष सातव,यांची अरणगाव दुमाला ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आठ अशा उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी यादव साहेब यांनी जाहीर केले असून एका जागेसाठी गोविंद नेटके,अतुल गेनु रणदिवे, राहुल आनंदा चव्हाण, रविंद्र बाळू गाडेकर असे एकूण ४ अर्ज असल्याने निवडणूक होणार आहे.
ही ग्रामपंचायत बिनविरोध करताना उदयोजक मुन्नाभाई शेख यांनी कुकडी कारखान्याचे संचालक मोहनराव आढाव व मा उपसरपंच आप्पा सातव हे कट्टर विरोधक असून मध्यस्थी करण्यासाठी महत्वाची भुमीका बनवली आहे .पाहिले अडीच वर्ष आढाव गटाला तर उपसरपंच पद सातव गटाला दिले असून सर्वांनी त्यांच्या मताला सहमती दर्शवली .
बिनविरोध मध्ये मोहनराव आढाव गटाचे चार व आप्पा सातव गटाचे चार तर मुन्नाभाई शेख गटाचा १ उमेदवार मध्यस्थी असुन सातव गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले असून त्यांच्या वाटेवर आलेल्या एका उमेदवाराची निडणुक लागली असून ही निवडणुक चार तारखेला होणार आहे.
पुर्ण बिनविरोध साठी एका जागेवर अपयश आलं मतदार कोणाला कौल देणार ...? अशी चर्चा गावातील घराघरात चालू असून शेजारील गावांनमध्ये चाय पे चर्चा हॉटेल , दुकान,चहाची टपरी येथे चहाचे झुरके घेत आरणगाव दुमाला ग्रामपंचायतील एका जागेसाठी चर्चाच चर्चा सुरू झाली. त्यात कोण विजय होणार शेजारील गावांनमध्ये चाय पे चर्चा हॉटेल , दुकान,चहाची टपरी येथे चहाचे झुरके घेत आरणगाव दुमाला ग्रामपंचायतील एका जागेसाठी चर्चाच चर्चा सुरू झाली. त्यात कोण विजय होणार..? का ठरलेल्या उमेदवाराला मतदार कौल देणार का...? या चर्चेला चांगलाच रंग चढला आहे.
अरणगाव दुमाला ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री घनश्याम अण्णा शेलार व माजी आमदार राहुल दादा जगताप यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आम्ही सर्वजण एकत्र आल्याने गावचा विकास होऊन गाव विकासाच्या मार्गावर नेल्या शिवाय राहणार नाही निवडणूक काळात एकमेकांच्या विरोधात निर्माण होणारी कटुता थांबेल या उद्देशाने पुर्ण बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आठ जागा बिनविरोध करून शासनाचा खर्च टाळण्याचाही प्रयत्न केला पण नव्या जागेसाठी बिनविरोध ही करण्याचा आम्ही सर्वानी जीवाचे रान करून प्रयत्नही केला पण अपयश आले . मी विरोधी गटाचा व मुन्नाभाई शेख आणि ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे .
मोहनराव आढाव
(कुकडी कारखान्याचे संचालक)
गावामध्ये सर्वांचे नातेसंबंध मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे आम्ही सगळे एकच आहोत निवडणुकीत याची आडवा त्याची जिरवा असे राजकारण होऊ नये म्हणून आम्ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.:-
आप्पा सातव
(मा. उपसरपंच)
संपूर्ण गाव एकत्र आणण्याच्या आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पण एका जागेसाठी निवडणुक होते याची खंत वाटते त्यामुळे कोणीही जल्लोशही केला नाही .ज्यांनी कोणी खोडा घातला त्यांना निवडणुकीत जनता जागा दाखुन देईल. आठ जागा बिनविरोध झाल्याबद्दल मोहनराव आढाव व आप्पा सातव तसेच ग्रामस्थांनी माझ्या मताला सहमती दर्शवली त्यांचा मी मनापासुन आभारी आहे.-
मुन्नाभाई शेख
(उद्योजक)
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.