बोगस नोटरी दस्त करून महिला डॉक्टरांची फसवणूक प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळला

By : Polticalface Team ,Wed Jul 27 2022 21:17:25 GMT+0530 (India Standard Time)

बोगस नोटरी दस्त करून  महिला डॉक्टरांची फसवणूक प्रकरणी  अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळला करमाळा प्रतिनिधी बोगस नोटरी दस्त करून महिला डॉक्टरांची फसवणूक प्रकरणी करमाळ्यातील बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळला आहे. याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी डॉक्टर वैशाली पंकज शहा या सध्या चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे त्यांचे सासरी राहण्यास असून त्यांचे चाकण येथेच क्लिनिक आहे. त्यांचे वडील प्रकाश मेहता हे दिनांक 26/02/1995 रोजी मयत झालेले होते. तसेच त्यांची आई सरोजिनी मेहता या 25/07/2016 रोजी मयत झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे नावे असलेली सिटी सर्वे नंबर 2712/ ब या जागेवर त्यांची वारस म्हणून नोंद लागलेली होती सदरची जागा ही दत्तपेठ करमाळा येथील मोक्याचे ठिकाणी असल्याने यातील आरोपी नंबर एक सोहेल अब्बास शेख व त्याचे वडील अब्बास शेख यांनी सदर जागा विकायचे आहे काय याबाबत विचारणा केली होती परंतु यातील फिर्यादीने सदरची जागा आम्हास विकायची नाही असे सांगितले होते व तदनंतर फिर्यादी ही करमाळा येथे राहत नसल्याचा फायदा घेऊन सोहेल अब्बास शेख व अब्बास शेख याने बोगस नोटरी दस्त बनवला व सदर दस्तावर मुन्ना पत्तू शेख व तुषार मधुकर शिंदे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या व यातील फिर्यादीस रक्कम रुपये दहा लाख रुपये दिल्याचे दाखवून साठेखत केल्याचे बोगस दस्त तयार केला यातील फिर्यादीच्या बोगस सह्या करून त्या आधारे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर करून फिर्यादीच्या सहमतीशिवाय वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब यातील फिर्यादीस समजल्यानंतर तिने सर्व कागदपत्र हस्तगत करून करमाळा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 420 468 470 471 511 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती व तदनंतर यातील आरोपींनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन साठी धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे सी जगदाळे साहेब यांच्यासमोर झाली जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी सरकारी वकील श्री पी ए बोचरे व मूळ फिर्यादीचे वकील श्री सुहास मोरे करमाळा यांनी बाजू मांडली व त्यांनी युक्तीवादामध्ये आरोपींची पोलिसांमार्फत चौकशी होणे गरजेचे असून सदरचा गुन्हा गंभीर आहे तसेच ओरिजनल कागदपत्रे हस्तगत करणे जरुरीचे असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे व यामध्ये आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करणे महत्त्वाचे आहे. असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सोहेल अब्बास शेख, मुन्ना फत्तु शेख, तुषार मधुकर शिंदे यांचा अटकपूर्वक जामीनाचा अर्ज फेटाळण्यात आला. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॕड पी ए बोचरे यांनी बाजू मांडली तर मूळ फिर्यादीतर्फे अॕड सुहास मोरे करमाळा व अॕड निखिल पाटील यांनी काम पाहिले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी