करमाळा पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

By : Polticalface Team ,Thu Jul 28 2022 19:32:08 GMT+0530 (India Standard Time)

करमाळा पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60  करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 28) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. रावगाव, पांडे, हिसरे, वीट, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, उमरड, जेऊर, वांगी, साडे व केम या पंचायत समीतीच्या गणासाठी ही आरक्षण सोडत झाली. नियंत्रक अधिकारी म्हणून भूसंपादनच्या उपजिल्हाधीकारी अरुणा गायकवाड व तहसीलदार समीर माने यांच्यासह नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सुभाष बदे, संतोष गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते. चंद्रकांत सरडे, संतोष वारे, देवानंद बागल,भाजपचे नरेंद्रसिंह ठाकूर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, देवानंद बागल, सुनिल सावंत, चंद्रशेखर जोगळेकर,धनाजी ननवरे,अशोक सरडे,राजू कांबळे,उदय ढेरे आदी उपस्थित होते. करमाळा तालुक्यात एसी 2 जागा त्यापैकी एक महिलांसाठी, स्त्रीयांसाठी 6 जागा असणार आहेत. ओबीसीसाठी 3 जागा असणार आहेत त्यापैकी 2 जागा महिलांसाठी असणार आहेत. हे आरक्षण चक्रानुक्रमाप्रमाणे काढण्यात आले. 2002 पासूनच्या निवडणुकीच्या निवडणुकीचे आरक्षण पाहुन हे आरक्षण सोडत करण्यात आली. अनुसुचित जातीसाठी (एसीसाठी) उमरड व वांगी हे गण असणार आहेत. नागरिकांचा मागास वर्गसाठी (ओबीसी) जेऊर व केम एका जागाएसाठी चिटी टाकण्यात आली त्यात (रावगाव, वीट व साडे) वीट हे आरक्षीत असणार आहे. तर रावगाव, पांडे, हिसरे, कोर्टी, केत्तूर, चिखलठाण, साडे सर्वसाधारणसाठी असणार आहे. त्यापैकी महिलांसाठी अनुसुचित जागेसाठी उमरड व वांगीपैकी उमरड हे महिलेसाठी तर वांगी सर्वसाधारणसाठी असणार आहे. ओबीसीसाठी केम व वीट गणासाठी एखदाही महिलांसाठी आरक्षण देण्यात आले नव्हते त्यामुळे तेथे थेट आरक्षण देण्यात आले. सर्वसाधारण महिलांठी 7 गण आहेत. त्यापैकी पांडे, कोर्टी, केत्तूर व चिखलठाण येथे एखदाही महिला आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे येथे चिट्टी टाकुन आरक्षण काढण्यात आले. त्यात कोर्टी, चिखलठाण व पांडे हे गण महिला सर्वसाधारणसाठी राहणार आहे. याबरोबर रावगाव सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. यावर आक्षेप असतील तर 2 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी