श्रीगोंदा तालुक्यांतील अनधिकृत कॉफी कॅफे, बार, हॉटेल कम लोजिंग बंद करण्यात यावे:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट
By : Polticalface Team ,Fri Jul 29 2022 01:50:12 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: शहरामध्ये सध्या कॅफे बार या नावाखाली तब्बल सात ते आठ हॉटेल कम लॉजिंग कम वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आमच्या प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तीन कॅफे बारमध्ये जावून प्रत्यक्षात पाहणी केली असता याठिकाणी सात ते दहा फुटी प्लायवूडचे पार्टिशन कंम्पार्मेंट रूम बनवण्यात आलेल्या असून आंबटशौकीन असणाऱ्या तरुण-तरुणींच्या अनैतिक भेटीचे आणि अश्लील चाळे करण्याचे केंद्र बनले असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या तरुण-तरुणींना मोकळीक मिळाल्यामुळे कॉफी कॅफे बारमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत मोठा राबता असतो. अनैतिकपणे पैसे कमावण्याच्या नादामध्ये ह्या व्यावसायिकांनी मोठा कळसच केला असून आता वयाची अठरा पूर्ण झालेल्या कायदेशीररीत्या साक्षर समजल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींच्या बरोबरीने अल्पवयीन कुमार-कुमारिकांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. तसेच याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची नोंदणी घेतली जात नसल्यामुळे अनेक विकृत कृत्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे मुलां-मुलींच्या आयुष्याचा खेळ करून बरबादी करणाऱ्या या कॉफी कॅफे बारमधील अश्लील कृत्यांवर तातडीने आळा घालणे गरजेचे बनले आहे.
मागील काही महिन्यांपासून श्रीगोंदा शहरातील अल्पवयीन मुले-मुली पळून गेल्याच्या घटनाची नोंद पोलीस दप्तरी असून हि प्रकरणे अजूनही प्रलंबितच आहेत. या आणि अशाप्रकारच्या अनैतिक घटना घडण्यासाठी जबाबदार असणारे अनधिकृत कॉफी कॅफे बारच्या चालक-मालकांसह त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. या विषयाबाबत पालक व सामाजिक कार्यकर्ते पोलीस कारवाईची वाट पहात आहेत. परंतु कारवाई फक्त कागदावरच होत असल्याने कॅफे मालकांचे फावते आहे. अल्पवयीन मुले-मुलींना वाईट वळणावर नेणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तरी वरील प्रशासनास आम्ही नम्रपणे विनंती करतोत की, कॉफी कॅफे बारमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी सात ते दहा फुटी प्लायवूडचे पार्टिशन कंम्पार्मेंट रूम बनवून जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालक मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या कॉफी कॅफे बारमधील प्लायवूडचे पार्टिशन कंम्पार्मेंट रूम पूर्णपणे काढून टाकण्यात याव्यात. सदरील कारवाई आज दि. २८/०७/२०२२ ते ३१/०७/२०२२ पर्यंत होणे अपेक्षित आहे. याबाबत प्रशासकीय उदासीनता निदर्शनास आल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने दि. ०१ ऑगस्ट २०२२ पासून कोणतीही पूर्वसूचना न देता शहरासह तालुक्यातील बेकायदेशीरपणे चालू असलेल्या व अश्लील चाळे करत वेश्याव्यवसायाला कारणीभूत ठरणाऱ्या कॉफी कॅफे बारसंदर्भात रिपाई स्टाईलने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पालकांच्या समक्ष पुढील कारवाईसाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येईल.
यावेळी उद्भवलेल्या सर्व परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी आपणा सर्व प्रशासनाची असेल या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, तहसिलदार मिलिंद कुलथे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, शहराध्यक्ष युवराज घोडके, तालुका सचिव राजू काळेवाघ, तालुका संघटक आनंद शिंदे, मा. युवक तालुकाध्यक्ष जॉन घोडके, युवक तालुका उपाध्यक्ष संदीप ससाणे, युवक शहराध्यक्ष चेतन ससाणे, उपशहराध्यक्ष किरण तुपे इत्यादी रिपाई पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.