गुंडेगाव ग्रामसभेत महिला सरपंच च्या पतीराज्याची गुंडागर्दी भाऊसाहेब शिंदे आक्रमक होताच ग्रामसभा तहकुब
By : Polticalface Team ,Sat Jul 30 2022 05:36:38 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर: नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायत ने शुक्रवारी दि 29 जुलै रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते या ग्रामसभेसाठी गावातील नागरिक मात्र कमी संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामसभेला 13 पैकी केवळ तीनच सदस्य उपस्थित असताना ग्रामसभेला सुरवात करण्यात आली त्यानंतर युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी माईक चा ताबा घेतला आणि निम्म्या पेक्षा कमी सदस्य असताना ग्रामसभा कशी घेता? तात्काळ ग्रामसभा तहकुब करा अशी मागणी केली त्या मागणी नंतर देखील ग्रामसभा चालू ठेवण्याचा निर्णय घेऊन ग्रामसभा चालू ठेवली त्यामध्ये गुंडेगाव च्या सरपंच च्या पतीराज्याची ग्रामसभेत गुंडागर्दी दिसून आली त्यांनी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे ना माईक वर बोलू नको खाली जा म्हणत अरेरावी करून ग्रामसभा चालू ठेवली त्यानंतर मात्र ग्रामस्थ अधिक आक्रमक झालेले पाहायला भेटले त्यानंतर युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे नी अतिशय आक्रमक होत ग्रामसभा चालू असताना माईक च उचलून नेला त्यानंतर युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे व ग्रामस्थ अधिक आक्रमक झाल्यानंतर मात्र तात्काळ ग्रामसभा तहकुब करण्यात आली यावेळी काही काळ गोंधळ उडल्याला दिसून आला यावेळी पत्रकार दादासाहेब आगळे, पत्रकार, संजय भापकर, पत्रकार दादासाहेब जावळे हे उपस्थित होते
वाचक क्रमांक :