एक कौतुकास्पद उपक्रम शाळेतील सर्व मुलांना डिक्शनरी वाटप करुन मुलगा संविधानचा वाढदिवस वडीलांनी केला साजरा.
By : Polticalface Team ,Sun Jul 31 2022 10:05:23 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: तालुक्यांतील
पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील संविधान हा इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्याचा आज वाढदिवस हा त्याचे पप्पा दिपक मस्के यांनी अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा पेडगाव जुने शाळेतील सर्व विद्यार्थांना डिक्शनरी देऊन साजरा केला. संविधान हा इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. संविधान चे शिक्षक यांनी मुलांना डिक्शनरी आणणयाला सांगितले होते. त्यानुसार त्याचे वडील यांनी त्याला एक महिना अगोदर डिक्शनरी आणली होती.अशीच
डिक्शनरी संविधानाचे वर्गातील मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देऊ अशे त्याने त्याच्या पप्पांना सांगितले व त्याने त्यांचे शिक्षक भुजबळ सर यांच्या कडुन आकडे वारी घेऊन पप्पांना डिक्शनरी आणयास सांगितले व सर्व विद्यार्थांना डिक्शनरी वाटप करुन वाढदिवस साजरा केला संविधानचा नवव्या वाढदिवस सर्व विध्यार्थी, मुख्याधयापक, शिक्षक त्याचे पप्पा दिपक मस्के, मामा बाळासाहेब धेंडे यांनी उपस्थित राहून जिल्हा परिषद शाळा पेडगाव येथे साजरा केला.
वाचक क्रमांक :