करमाळा अर्बन बँक सुस्थितीत असून बँकेच्या ठेवीदारांनी घाबरू नये बँकेचे चेअरमन श्री कन्हैयालाल देवी यांनी केले ठेवीदारांना आवाहन
By : Polticalface Team ,Sun Jul 31 2022 11:31:05 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेने (RBI) ने राज्यातील तीन सहकारी बँकावर बँकेची आर्थिक स्थिती पाहता हे लक्षात आल्यानंतर या बँकावर पैसे काढण्यासह अन्य निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामध्ये करमाळा जि.सोलापूर येथील करमाळा को.ऑप.बँक लि.करमाळा जि.सोलापूर या बँकेचा समावेश असून या बँकेच्या ग्राहकांना आता 10 हजार रुपयांच्यावर रक्कम काढता येणार नाही. एकावेळी 10 हजार रुपये पर्यंत पैसे काढता येणार आहेत.
या बँकावर निर्बंधाचा भाग म्हणून दोन सहकारी बँका कर्ज देवू शकत नाहीत. त्याच बरोबर कोणतीही गुंतवणूक करु शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या नवीन ठेवी स्विकारु शकत नाहीत. तसेच पैसे उधार घेणे व मालमत्तेचे विवरण करणे आदिवर निर्बंध घालण्यात आलेल्या आहेत. या तीन बँकांना निर्बंध जारी करणे म्हणजे त्यांचा बँक परवाना रद्द करणे असा अर्थ कोणी काढू नये फक्त् बँकेची आर्थिक स्थिती सुधारणे पर्यंत व बँकेची स्थिती अधिक मजबुत करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. असे ही रिर्झव्ह बँकने म्हणालेले आहे
याबाबत दि.करमाळा अर्बन को.ऑप. बँकेचे चेअरमन श्री.कन्हैयालाल गिरधरदास देवी म्हणाले की, RBI च्या सुचनेनुसार बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करुन जवळपास 1 कोटी रु.चे शेअर्स, भागभांडवल गोळा केलेले आहे. त्याच बरोबर 3.50 कोटी रु.ची थकीत वसुली पुर्ण केलेली आहे हा अहवाल आम्हीं येत्या आठ दिवसामध्ये RBI ला सादर करणार असून एका महिन्याच्या आत बँकेवरील सर्व निर्बंध उठविले जातील. त्याच बरोबर सध्या बँकेकडे ज्या नागरिकांच्या ठेवी आहेत त्या ठेवी सुरक्षित असून या ठेवींना विमा कवच असल्यामुळे ठेवीदारांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी निश्चिंत रहावे असे आवाहन श्री.देवी यांनी केले आहे
करमाळा अर्बन बँक ही आजही ठेवीदार व ग्राहकाच्या पूर्णपणे सहकार्यावर चालू असून कोणीही याबाबत गैर समज पसरू नये असे श्री देवी शेवटी बोलताना म्हणाले
वाचक क्रमांक :