श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य बी. टी मखरे यांची निवड
By : Polticalface Team ,Wed Aug 03 2022 17:18:46 GMT+0530 (India Standard Time)
भानगाव येथे नुकत्याच संपलेल्या श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत श्रीगोंदा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघाच्या अध्यक्षपदी श्रीगोंदा येथील शारदा विद्यानिकेतनच्या होनराव माध्यमिक विद्यालय व एन एस गुळवे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी. टी मखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्राचार्य मखरे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ओबीसी शिक्षक नेते प्राध्यापक पांडुरंग भोपळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य समन्वयक प्राध्यापक राम सोनवणे, राज्य सल्लागार प्राध्यापक दादासाहेब गिरमकर, तसेच प्रा. नितीन झणझणे, प्रा.योगेश गायकवाड व इतर प्रदेश पदाधिकारी व मुख्याध्यापिका संगिता वनपुरे उपस्थित होत्या.
यावेळी प्राचार्य मखरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की अघोषित ज्युनिअर कॉलेज व शाळा तसेच अंशतः अनुदानित ज्युनिअर कॉलेज व शाळा यांना प्रचलित नुसार अनुदान मिळावे यासाठी राज्याच्या संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करणार आहोत अशी ग्वाही यावेळी प्राचार्य मखरे यांनी दिली.
वाचक क्रमांक :