इन्स्पायर अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव

By : Polticalface Team ,Wed Aug 03 2022 19:34:34 GMT+0530 (India Standard Time)

इन्स्पायर अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव दिनांक २ ऑगस्ट: सनराईज एज्युकेशन सोसायटी संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी राज्यस्तरीय ऑफलाईन अबॅकस स्पर्धा मुक्ताई लॉन्स, चऱ्होली फाटा, पुणे या ठिकाणी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ६२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही आपल्या दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट अभ्यासक्रम, गुणवंत व प्रशिक्षित शिक्षक वृंद, बदलत्या काळानुसार ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणारी अकॅडमी असल्याने गुणवत्तेच्या जोरावर अकॅडमीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही अनेक ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार केला आहे. इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने घेतलेल्या क्लासेस मुळे मुले अंकगणितात हुशार होतात; मुले संगणक व कॅल्क्युलेटर पेक्षा जलद गतीने गणिते सोडवतात; मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलन शक्ती व आत्मविश्वास यामध्ये वाढ होते. या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय उपयोग होतो. रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत स्पर्धेचे आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले व सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आदित्य लोखंडे, आदित्य सोनवणे, आदित्य मुळे, स्वरा शिंदे, विराज निकम, केतन पठाडे, संस्कार मुळे, पृथ्वीराज पाटील, कृष्णा खांदवे, साईराज खंडागळे, सार्थक झगडे, स्वरा राख, आदित्य गायकवाड, स्वरूप विधाते, रामेश्वरी तापकीर, सृष्टी वामन, समृद्धी साठे, चैत्राली वाळके, सोहम बन, सिद्धेश शिंदे व नैतिक शिंदे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी चे सर्वोत्तम पारितोषिक मिळविले. तसेच अकॅडमीच्या कार्यात आपल्या कर्तुत्वाची छाप पाडणाऱ्या सौ. मंजू पाटील, सौ. सुमनकुमारी गुप्ता, सौ. सायली गाडेकर, सौ. अर्चना मोरे मॅडम यांना बेस्ट टीचर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. साधनाताई तापकीर (पिंपरी चिंचवड मनपा विद्यमान नगरसेविका), सौ. सुवर्णाताई बुर्डे (पिंपरी चिंचवड मनपा विद्यमान नगरसेविका), मा. डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, जि. प. ठाणे), मा. सुनील कुऱ्हाडे (माजी शिक्षणाधिकारी, जि. प. पुणे), मा. गोपाळभाऊ रक्ताटे (माजी सभापती पंचायत समिती आष्टी), मा. हरिष चौधरी (अध्यक्ष पिंपरी चिंचवड खाजगी अनुदानित शिक्षक पतसंस्था भोसरी, पुणे), मा. मंगेश कारखिले (अभियंता पुणे), मा. तानाजी लोहकरे (संगीत विशारद, आदर्श शिक्षक जिजामाता विद्यालय भोसरी पुणे) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक समारंभ पार पाडला. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप भद्रे, संचालक श्री. दादासाहेब शेळके, सचिव सौ. सत्यशीला भद्रे, संचालिका सौ. अर्चना शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ. सत्यशीला भद्रे व संचालिका सौ अर्चना शेळके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना या कार्यात अकॅडमीतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर हिरवे, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप भद्रे व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. दादासाहेब शेळके यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.