वाळूतस्करां कडून युवकावर झालेल्या प्राणघातक हल्याच्या निषेधार्थ कैकाडी समाजाचे श्रीगोंदा तहसील समोरं लाक्षणिक उपोषण

By : Polticalface Team ,Thu Aug 04 2022 10:26:55 GMT+0530 (India Standard Time)

वाळूतस्करां कडून युवकावर झालेल्या प्राणघातक हल्याच्या निषेधार्थ कैकाडी समाजाचे श्रीगोंदा तहसील समोरं लाक्षणिक उपोषण दिनांक 4 ऑगस्ट 2822, श्रीगोंदा: तालुक्यातील पेडगाव येथे समाजातील अशोक जाधव व त्यांचा मुलगा राहुल जाधव यांच्यावर दिनांक 30 जुलै 2022 रोजी तेथील गाव गुंडांकडून प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ काल दिनांक 3ऑगस्ट 2022 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सकल कैकाडी समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. निषेध सभेस भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या बाबंत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी अशोक जाधव रा .पेडगाव यांना चार-पाच गावगुंडांनी तुझ्याकडे आमचे काम आहे. म्हणून, बोलवून गाडीत बसून घेऊन गेले. तू आमच्या विरोधात पोलिसांना महसूल खात्याला आम्ही वाळू चोरून काढतो म्हणून, फोन करतोस व आमच्या गाड्या धरून देतोस..! या कारणावरून तुला आम्ही जीवच मारणार आहे. तुझा कायमचा काटा काढणार आहे. असे म्हणून जबर मारहाण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यातून ते बचावले.. दवाखान्यात वेळीच उपचार घेतले नसता.! तर, मोठा अनर्थ घडला असता. त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. तरी, श्रीगोंदा पोलिसांनी घटनेची दखल घेतली नाही. कैकाडी समाज हा समजदार व अत्यंत गरीब असल्याकारणाने एवढा मोठा भ्याड हल्ला होऊन सुद्धा मिटवण्याची भूमिका गावातील लोकांनी श्रीगोंदा शहरातील लोकांनी पेडगावात शांतता राहील म्हणून हे प्रकरण जागेवर मिटवण्याचा प्रयत्न केला. कैकाडी समाजाचे त्या गावात एकच घर असल्याने, त्यांच्यावरती अन्याय झाला. तरी, येथील कैकाडी समाज सुद्धा गावाच्या आणि तालुक्याच्या पुढे गेला नाही. त्यावेळेस मिटून घेतल्याने गावगुंडांचे मनोबल वाढले. आमचं कुणीही काही करू शकत नाही..? या हेतूने गावगुंडांनी पुन्हा दिनांक 30 जुलै 2022 रोजी अशोक जाधव यांचा मुलगा राहुल जाधव याला गुंडांनी उचलून नेऊन जवळपास तीन ते चार तास मारहाण करत दुखापत केली. शेवटी कुटुंबाला कळल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेस त्याला गावकुसाच्या आत आणून टाकले. हे समजल्यानंतर कुटुंबाने त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गाठले व दवाखान्यामध्ये दाखल केले. त्याने घटनेचे वास्तव सांगितले की, त्याला सदरील गावगुंडांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला. तुला जीव मारून Jcb ने जमिनीत खड्डा करून त्यात पुरवतो. असे म्हणत त्याला हात पाय बांधून खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले व मारहाण करत होते. त्यांच्याकडे महेंद्रा स्कार्पिओ गाडीमध्ये तलवार, हॉकी स्टिक, गज असे हत्यारे होती. त्याने मारहाण केली. आरडाओरडा झाल्याने काही लोकांनी ही घटना पाहिली अंन सदरील घटनेपासून गाव गुंडनी गाडी घेऊन पळ काढला.. त्यामूळे राहुल जाधवची मारहानीतून सुटका झाली. या गावगुंडांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी व कायमस्वरूपीचा बंदोबस्त व्हावा. याकरिता कैकाडी समाजाच्या वतीने ही निषेध सभा व लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या गुन्हेगारांना तातडीने अटक करा.., फिर्यादीचा पुन्हा जबाब घेऊन, सत्य परिस्थितीनुसार गुन्हा दाखल व्हावा.., पेडगाव येथील कैकाडी समाजातील लोकांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.. याकरिता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, कैकाडी समाज संघटना जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, कैकाडी समाज संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष डी आर गायकवाड, कैकाडी समाज युवक उपाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र गायकवाड, कैकडी समाजाचे ज्येष्ठ नेते कारभारी गायकवाड, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नितीनजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व पीडित कुटुंबही उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष