स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटना एकत्र जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार
(साखर सम्राटांना सार्वजनिक राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन)
By : Polticalface Team ,Thu Aug 04 2022 20:51:13 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक ३ ऑगस्ट:
आगामी जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटना एकत्रितपणे भाग घेणार असून साखर सम्राटांना इतर राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन स्वतंत्र भारत पार्टी, शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या गट व गणामध्ये उमेदवार देऊन तालुक्यातील जनतेला एक उत्तम पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तालुक्यात बहुसंख्येने असलेले किसन व जवान एकत्र आले तर कुठल्याही बलाढ्य सक्तीचा पराभव होऊ शकतो. तालुक्याच्या राजकारणात नेहमीचेच चेहरे आहेत व त्यांच्या भ्रस्ट कारभारामुळे रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी विषया मध्ये योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. हे चित्र बदलायचे असेल तर प्रामाणिक उमेदवारांना निवडून देऊन कारभार करण्याची संधी दिली पाहिजे.
तालुक्याच्या राजकारणावर साखर कारखानदारीशी संबंधित घराण्यांच्या वरचष्मा राहिला आहे. सर्व निवडणुकांमध्ये या घराण्यातल्या कुटूंबियाचे प्रतिनिधीत्व असते. समाजात अनेक वर्षे सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून यांच्याच कुटुंबातील पत्नी, मुलगा, सून, पुतण्या आशा कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाते. पैश्याच्या जोरावर निवडूनही आणले जाते पण समाजाच्या समस्यांची जण नाही, सामाजिक कामाचा अनुभव नसल्यामुळे प्रत्यक्ष कामकाज दुसरेच कोणीतरी पहात असते. सर्व कामात टक्केवारी मिळवणे इतकाच या पदावर निवडून येण्याचा हेतू असतो म्हणून सर्व साखर सम्राटांच्या कुटुंबियांना पराभूत करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
स्वतंत्र भारत पार्टी, माजी सैनिक संघटना व शेतकरी संघटना मिळून सर्व जागांवर योग्य उमेदवार उभे करणार आहेत. श्रीगोंदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रिय अध्यक्ष, अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विक्रम शेळके, माजी सैनिक संघटनेचे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदीप सांगळे,
श्रीगोंदा शहराध्यक्ष नवनाथ खामकर ,भाऊसाहेब शिंदे, साहेबराव पोखरकर,
स्व. भा. पार्टीचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष, अनिल भुजबळ, तालुका उपाध्यक्ष , बाळासाहेब सातव, आदी प्रमुख पदाधीकरी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्व. भा. पा.
संदीप सांगळे, ता. अध्यक्ष, माजी सै. संघटना.
विक्रम शेळके, जिल्हाध्यक्ष (नगर द.)
नवनाथ खामकर, मा. सै. संघटना श्रीगोंदा शहर अध्यक्ष, अनिल भुजबळ, स्व भा पा जिल्हाध्यक्ष, (नगर द.) बाळासाहेब सातव शे. संघटना, श्रीगोंदा ता.उपाअध्यक्ष.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.