जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत साखर सम्राटांना विरुद्ध निवडणुक लढणार : अनिल घनवट.
By : Polticalface Team ,
साखर सम्राटांना टक्कर शेतकरी आणि माजी सैनिक संघटना, स्वतंत्र भारत पार्टी येणार एकत्र श्रीगोंदा तालुक्यातील साखर सम्राटांना इतर राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या गट व गणामध्ये सर्व जागांवर उमेदवार देऊन तालुक्यातील जनतेला एक उत्तम पर्याय देण्यासाठी स्वतंत्र भारत पार्टी , शेतकरी संघटना माजी सैनिक संघटना एकत्रित लढणार असल्याचे स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी स्वतंत्र भारत पार्टी , शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते . पत्रकार परिषदेत पुढे बोलताना घनवट यांनी सांगितले की तालुक्याच्या राजकारणात नेहमीचेच चेहरे असून भ्रष्ट कारभारामुळे रस्ते पाणी शिक्षण , आरोग्य विषयी अनेक तक्रारी असून हे चित्र बदलायचे असेल तर निवडणुकीत प्रामाणिक उमेदवारांना निवडून देऊन कारभार करण्याची संधी तालुक्याच्या राजकारणावर साखर कारखानदारीशी संबंधित घराण्यांच्या वरचष्मा राहिला असून , सर्व ठिकाणी या घराण्यातल्या कुटूंबियाचे प्रतिनिधीत्व असते समाजात चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून यांच्याच कुटुंबातील पत्नी मुलगा , सून , पुतण्या आशा कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देऊन धनशक्तीच्या जोरावर निवडूनही आणले जाते . निवडून आल्यामुळे तसेच सामाजिक कामाचा अनुभव नसल्यामुळे सर्व कामात टक्केवारी मिळवणे इतकाच या पदावर निवडून येण्याचा हेतू असतो . याचा बीमोड करण्यासाठी निवडणुकीत प्रामाणिक उमेदवारांना निवडून देऊन कारभार करण्याची संधी पाहिजे . शेतकरी आणि सैनिक एकत्र आल्यावर कोणत्याही बलाढ्य सक्तीचा पराभव होऊ शकतो.
वाचक क्रमांक :