पेडगाव येथे विविध विकास कामांचे राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते भूमिपूजन , पेडगाव ग्रामपंचायत सुमारे 60 लाख निधी खर्च करणार

By : Polticalface Team ,Fri Aug 05 2022 22:25:02 GMT+0530 (India Standard Time)

पेडगाव येथे विविध विकास कामांचे राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते भूमिपूजन , पेडगाव ग्रामपंचायत सुमारे 60 लाख निधी खर्च करणार पेडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामाचा शुभारंभ सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय राजेंद्र दादा नागवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यामध्ये गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे तीन रस्ते, दलित वस्तीत सामाजिक सभागृह, सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी अंडरग्राउंड गटार योजना तसेच आंबेडकर नगर मधील चौकाचे सुशोभीकरण अशा सुमारे 60 लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, पेडगावच्या सरपंच सौ सुलोचना कणसे यांच्या नेतृत्वाखाली पेडगाव ग्रामपंचायत ने आजवर गावाच्या हितासाठी अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत. लोकांना सुख सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय काम केले आहे. वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक हिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवून पेडगाव ग्रामपंचायतने एक आदर्श असे विकासाचे मॉडेल तालुक्यात उभे केले आहे. आम्ही विकास कामासाठी सदैव ग्रामपंचायतीला पाठबळ देऊ असे आश्वासन नागवडे यांनी दिले. सुरुवातीस प्रास्ताविक करताना सरपंच पती श्री भगवानराव कणसे यांनी विकास कामात तालुक्याचे नेते राजेंद्र दादा नागवडे हे नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात त्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत तात्या ओगले यांनी भरीव मदत केल्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमास राजेंद्र दादा नागवडे यांच्या समवेत नागवडे सहकारी कारखान्याचे संचालक श्री भाऊसाहेब नेटके, दादा आवटी, पेडगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सोलोचना कणसे, उपसरपंच इरफान भाई काझी, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव लाटे, सरपंचपती भगवानआप्पा कणसे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत भैया ओगले, नारायण कणसे, प्रकाश घोडके, जालिंदर खेडकर, बशीर काझी, बाळासाहेब नवले, दादासाहेब शिर्के, रामदास आबा नन्नवरे , इरफान पिरजादे, शकूर शेख, जहांगीर शेख, भाऊसाहेब गावडे, नवनाथ तनपुरे, अमोल भोसले, बापूराव कणसे, शफिक तांबोळी, सुनील जाखडे, दिलीप कराळे, जालिंदर खेडकर, युवराज घोडके, नितीन खेडकर, श्री अमोल जाखडे पाटील, दादासाहेब शिर्के, रामदास आबा नन्नवरे , नवनाथ शिरसागर, शफिक भाई तांबोळी , मौलाना अझरुद्दीन काजी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.