By : Polticalface Team ,Fri Aug 05 2022 23:18:58 GMT+0530 (India Standard Time)
काही दिवसांपूर्वीच शिंदे - फडणवीस सरकारने जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये सुटल्यानंतर न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तसेच महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश दिले होते.
पण आता राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने कायद्यात सुधारणा करत सदस्य संख्या बदलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या सर्व प्रक्रिया नव्याने कराव्या लागणार असल्याने निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे वाचक क्रमांक :