श्री छत्रपती कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल शेडगाव येथील शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले
By : Polticalface Team ,Sat Aug 06 2022 13:40:43 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोद्यातील नामांकित अशा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांची निवड झाल्याबददल महाराष्ट्र राज्य ओबीसी शिक्षक नेते प्रा.पांडुरंग भोपळे व त्यांचे सहकारी प्रा.संजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
प्राचार्य सूर्यवंशी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच
अनेक चांगल्या कल्पना व योजना महाविद्यालयात राबविणार तसेच विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडणाऱ्या गोष्टी राबविणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी प्रा.राजाराम वगरे, प्रा.शिवाजी नेटके व प्रा.नितिन झणझणे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :