बीडच्या अविनाश साबळेनी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक
By : Polticalface Team ,Sat Aug 06 2022 22:19:06 GMT+0530 (India Standard Time)
बीड : बीडच्या शेतकरी पुत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे.
अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकं मिळवण्याची घोडदौड अद्यापही सुरुच आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्याच्या जीवावर ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय. त्यामुळे राज्यभरातून त्याचं कौतुक होत आहे
वाचक क्रमांक :