अभिमानास्पद!करमाळ्याची राजलक्ष्मी सुतार सोलापूर जिल्हास्तरीय योगस्पर्धेत प्रथम
By : Polticalface Team ,Mon Aug 08 2022 09:54:16 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि:
सोलापूर योग अससोसिएशनच्या वतीने दिनांक 7 ऑगस्ट रोजी बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर येथे सोलापूर ज़िल्हा योगासन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत त्रिमूर्ती स्पोर्ट क्लबची प्राशिक्षणार्थी कुमारी राजलक्ष्मी सुतार हिने मुलींच्या 12 ते 14 या वयोगटात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. विविध वयोगटात राबवलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. तिने करमाळयाच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे. तिने नियमित योगाचा सराव करून हे घवघवीत यश संपादन केले आहे.तिच्या या यशामागे आईवडिलांचा मोठा वाटा असल्याचे तिने बोलून दाखवले.तिच्या या यशात विशेष मार्गदर्शन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब जेऊर-करमाळा चे सागर शिरसकर सर यांचे लाभले आहे तसेच योग असोसिएशन सोलापूर चे ही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. राजलक्ष्मी सध्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा येथे इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक :