चिंभळे येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त वृक्षदिंडी आणि घर घर तिरंगा जनजागृती रॅली
By : Polticalface Team ,Wed Aug 10 2022 23:58:55 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
साई सेवा बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान चिंभळे संचलित हंगेश्वर पब्लिक स्कूल चिंभळे आणि के.पी. जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने स्कूल व कॉलेजचे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा"अर्थात घरोघरी तिरंगा भव्य रॅली काढली.गावातील नागरिकांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावरती तिरंगा झेंडा फडकावा असे आव्हान महाविद्यालयामार्फत करण्यात आले.
त्याचबरोबर गावातील स्मशानभूमीच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले व गावातून वृक्ष दिंडी देखील काढण्यात आली यामध्ये वृक्ष लागवड व त्याचे महत्त्व गावातील नागरिकांना पटवून दिले प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या वृक्षदिंडी व भव्य तिरंगा रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन शिवाजीराव जाधव संस्थेच्या सचिव डॉ. शुभांगी जाधव मॅडम ग्रामपंचायत सदस्य दीपक गायकवाड त्याचबरोबर चिंभळे गावातील नागरिक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मोहिते सर देवकर सर, घाडगे सर ,चोर सर ,मोरे मॅडम ,कासार मॅडम राहिंज मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :