By : Polticalface Team ,Thu Aug 11 2022 19:42:21 GMT+0530 (India Standard Time)
बुडालेल्यांपैकी तिघांची मृतदेह हाती लागलेत. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असताना बोटी संतुलन बिघडून ही दुर्घटना घडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बांदा येथील मरका घाट येथून फतेहपूर येथे ही बोट जात होती. या बोटमध्ये ५० लोक प्रवास करत होते. त्यात २० ते २५ महिलांबरोबर मुलेही होती. या महिला रक्षाबंधनासाठी माहेरी जात होत्या.
या बोटीतील ३५ जण बेपत्ता आहेत. त्यातील तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याचे माहिती प्रशासनाने दिले. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. बोट बुडण्याची धोका दिसल्यानंतर काही प्रवाशांनी नदीत उडी मारली. बोटीमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर बोट ही संपूर्णपणे नदीत बुडाले. त्यातील महिला आणि लहान मुले ही बेपत्ता झाली.
नदीच्या घाटावर उभ्या असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिल प्रशासनाला दिली. तर पोहता येणाऱ्या काही जणांनी नदीत उडी मारून काही जणांना वाचविले.
ही बोट चालविणाऱ्या चालकही सुरक्षितपणे बाहेर येऊन तो पसार झाले. आता प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने मृतदेहांचा शोध सुरू केलाय. दोन महिला आणि एक मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. इतरांचा शोध सुरू आहे. वाचक क्रमांक :