आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,Fri Aug 12 2022 17:28:08 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनीधी: श्रीगोंदा शहारातील प्रसिद्ध वडापाव मालक शिवराम वहाडणे यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून ९ ऑगस्ट रोजी सकाळी आत्महत्या केली होती. यावेळी त्यांच्या खिशात त्रास दिलेल्या १५ खाजगी सावकारांची नावे व रक्कम लिहिली होती. वहाडणे यांच्या पत्नी वंदना शिवराम वहाडणे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी ९ खाजगी सावकारांना अटक केली असून ६ सावकार फरार झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा शहरातील प्रसिध्द माऊली वडापावचे मालक शिवराम रमेश वहाडणे (वय वर्षे ४२) यांनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्रास दिलेल्या तब्बल १५ खाजगी सावकारांची नावे चिठ्ठीत लिहून व्याज व मुद्दल देऊनही वारंवार दुकान व घरी येऊन धमक्या व दमदाटी करत असल्याचे नमूद केले होते. याबाबत पत्नी वंदना शिवराम वहाडणे ( वय ३३ ) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की प्रवीण जाधव ४० हजार रुपये १० टक्के व्याजाने, कांतीलाल कोकाटे २ लाख रुपये ५ टक्के व्याजाने, अक्षय कैके २० हजार रुपये २० टक्के व्याजाने, बापू चव्हाण ५० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, राहूल धोत्रे ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने, आप्पा सांगळे २५ हजार ४० टक्के व्याजाने, जयसिंग मस्के अडीच लाख ४ टक्के व्याजाने, आबा झुंजरूक २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, धीरज भोसले १ लाख २० हजार रुपये २० टक्के व्याजाने, मुन्ना काळे १, लाख २० टक्के व्याजाने, आकाश भोसले १ लाख ३० हजार रुपये २० टक्के व्याजाने, राहूल खामकर ३० हजार रुपये ५ टक्के व्याजाने, विनोद घोडके २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, शिंदे सरपंच २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने व राजू बोरुडे ४० हजार रुपये ४० टक्के व्याजाने असे सर्वांचे मिळुन ११ लाख १५ हजार रुपये प्रति महिना ५ टक्के ते ४० टक्के व्याज दराने पैसे घेतले होते. माझ्या पतीने या सावकारांची व्याजासह मुद्दल देऊनही हे सावकार दुकान, घरी येऊन वारंवार पैशाची मागणी करत दमदाटी व धमक्या देत होते. या सर्व जाचाला माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. फिर्याद दाखल होताच पोलीसांनी सावकारांची धरपकड सुरू केली. यातील नऊ जण जयसिंग मस्के, शहाजी झुंजरूक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण, अक्षय कैके, राहूल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रविण जाधव व धीरज भोसले यांना अटक केली आहे व मात्र अजून ६ जण फरार झाले आहेत. या खळबळनक प्रकरणामुळे शहर व तालुक्यातील खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी