जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने तालुका श्रीगोंदा येथे अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन
By : Polticalface Team ,Fri Aug 12 2022 22:41:58 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने तालुका श्रीगोंदा येथे अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेऊन गावातून प्रभाग फेरीचे आयोजन केले होते. यानंतर शाळेत वतृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन केले होते . यामध्ये श्री दिगंबर भुजबळ सर व श्रीमती वैशाली परहर मॅडम यांनी लेझीमचे सर्व मुलांसह स्वतः उत्कृष्ट संचलन करून प्रभात फेरीची रंगत वाढवली.तसेच श्री संतोष सोनवणे व श्रीमती रंजना क्षीरसागर मॅडम यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच श्री दिलीप कुमार रासकर सर व मुख्याध्यापक श्री पांडुरंग चौधरी सर यांनी चित्रकला स्पर्धेतचे आयोजन करून मुलांचे एक ते तीन नंबर काढून स्पर्धकांना 15 ऑगस्ट 2022 रोजी बक्षीस वितरण वितरणाचे नियोजन केले . त्याचप्रमाणे शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या . अशा रीतीने शाळेत विविध उपक्रमांनी आजचा अमृत महोत्सवाचा दिवस साजरा करण्यात आला.
वाचक क्रमांक :