स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यात श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून माजी सैनिकांचा सन्मान
By : Polticalface Team ,Sat Aug 13 2022 14:23:00 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यात स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षण क्षेत्रातील विशेषतः तालुक्यात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सर्वच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र ध्वजारोहण करण्यात आले. प्रामुख्याने शासकीय निमशासकीय तसेच शिक्षण संस्थांमध्ये सलग तीन दिवस अमृत महोत्सव निमित्त तिरंग्याला सन्मानित करत ध्वजारोहण होत आहे. यानिमित्त तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण सोहळ्यास महाविद्यालयामध्ये नऊ माजी सैनिकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी प्रामुख्याने माजी सैनिक सर्वश्री पोपटराव सावळेराम येवले, सखाराम महादेव पवार, बाजीराव भाऊसाहेब म्हस्के, काशिनाथ किसन औताडे, आणि इब्राहिम बाबूलाल शेख या माजी सैनिकांना ध्वजारोहणास उपस्थितीबद्दल विद्यालयातर्फे सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सस्ते यावेळी म्हणाले की, सती, संत आणि शूर हे देशाची शान वाढवतात. शिवसैनिक हे आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात. सैनिक आपल्या जीवनातील उमेंदीचा काळ देशी सेवेसाठी घालवतात. आपली पत्नी, मुले, आई, वडील व कुटुंबाचा त्याग करून हे जवान सीमेवर तैनात असतात. असे सांगून ते पुढे म्हणाले की, कर्तव्यप्रती धैर्यामुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. याची जाणीव असायला हवी या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सन्मान करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याचे सांगून,
ते पुढे म्हणाले की 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या काळात भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. घराघराचा त्याग केला, प्रसंगी देशासाठी स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य भारताच्या तिरंगा ध्वज घराघरावर डौलाने फडकवत आहोत. आपला हा तिरंगा शहिदांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपली शान आहे. त्यांचा मान राखणे हे आपले सर्वांचे परम कर्तव्य असल्याचे प्राचार्य सस्ते यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती नौशाद शेख यांनी भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यानंतर भारताची जडणघडण, त्याकाळच्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय नेत्यांसह माजी सैनिकांचे योगदान या विषयांवर प्रकाशझोत टाकत देशाच्या या तरुण भावी पिढीने भारतीय संस्कृतीच्या परंपरेचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या ध्वजारोहण सोहळ्यास विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुंमकर देखील उपस्थित होते सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक श्री संजय दळवी यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी