जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माजी सैनिकांचा महा सन्मान सोहळा संपन्न !!
जिल्ह्यातून माजी सैनिकांची लक्षनिय उपस्थिती पोलिस प्रशासनाचे मानले आभार ...
By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 09:56:50 GMT+0530 (India Standard Time)
15ऑगस्ट 2022
प्रतिनिधी ,
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे विशाल राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक मनोज पाटील समवेत विविध पोलिस आधिकारी, कर्मचारी माजी सैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले . प्रत्येकाची देशभक्ती द्विगुणित होईल अशा नेत्रदीपक ,रोमहर्षक ,गौरवाशाली अविस्मरणीय सोहळयाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला ...
प्रसंगी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यामध्ये 280 माजी सैनिकांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कसलाही मोबदला न घेता अगदी निशुल्क सेवा दिली. त्यांची पोलीस अधीक्षक .मनोज पाटील यांनी दखल घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने या माजी सैनिकांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेऊन आदेश पारित केला ..
या बाबतचा विशेष पाठपुरावा जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी संस्थेच्या माध्यमांतून केला असून सदर संस्था आणी पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा माजी सैनिक महा सन्मान सोहळा घेण्यात आला
यासाठी दिवंगत मा.केंद्रीयमंत्री खा .दिलिप गांधी यांचे स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र भाजपा युवानेते सुवेन्द्र गांधी यांनी पुढाकार घेऊन
सम्मानचिन्ह देऊन देशसेवेचा आदर्श जोपासला.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हस्ते माजी सैनिकांचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. असून सर्व माजी सैनिकांचे अभिनंदन करण्यात आले . जिल्हाधिकारी यांनी सैनिकांच्या प्रती आदरभाव म्हणून अमृत जवान योजना महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे .
त्याचप्रमाणे माजी सैनिकांचा प्रथम रित्या सर्वात मोठा माजी सैनिक महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .
प्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमारअग्रवाल ,पोलीस उपाधिक्षक संजय नाईक पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीणचे अजित भागवत पाटील, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल अर्जुन कातकडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष कामगिरी कार्यक्षम पोलीस विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे, पो. हे . कॉ. दिलावर गुलाबभाई इनामदार,हे. कॉ प्रसाद चंद्रकांत गोरे हे. कॉ.भगवान रामदास वाघुले, ASI जगदीश पोटे,जमीर भाई शेख स्टेनो एसपी यांनी बजावून पोलिस प्रशासनाने बहुमोलाचे योगदान दिले.
कार्याक्रमा साठी मेजर निळकंठ उल्हारे, मेजर लहू सुलाखे ,मेजर रवी इंगळे , सचिव माधव उल्हारे, निवेदिका उज्वला उल्हारे, स्वस्तिक उल्हारे आदि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
सर्वाचे आभार संपादक मेजर भिमराव उल्हारे यांनी मानले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.