उद्योजक किरण कोतकर यांचा वाढदिवस व सुभेदार संतोष चौधरी यांची सुभेदार पदी बढती झाल्याबद्दल वृक्षलागवड करुन सत्कार

By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 21:45:33 GMT+0530 (India Standard Time)

उद्योजक किरण कोतकर  यांचा वाढदिवस व सुभेदार संतोष चौधरी यांची सुभेदार पदी बढती झाल्याबद्दल वृक्षलागवड करुन सत्कार तालुका प्रतिनिधी - आपल्या गावात खूप झाडे असावीत,वृक्षारोपण झालं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटत पण त्याची अंमलबजावणी खूप कमी लोक करतात.प्रत्येक वर्षी पावसाळा आला की वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो पण त्यातले किती झाड जगतात? मग झाडही लावली पाहिजे अन ती जगली पण पाहिजे म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी १५ आॅगस्ट रोजी गुंडेगाव येथील धावडेवाडी युवा प्रतिष्ठानच्या तरुणांनी गावातील यशस्वी उद्योजक किरण कोतकर यांचा वाढदिवस व सुभेदार पदी बढती झाल्याबद्दल संतोष चौधरी यांचा सत्कार करुन वृक्षलागवड उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक तरुण झाडे घेऊन हजर होते. वाढदिवसाच्या व वृक्षलागवड उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना मा.अर्थ व बांधकाम सभापती बाळासाहेब हराळ म्हणाले प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मिळालेली भेट प्रत्येक माणसासाठी खूप अभूतपूर्व असते.तो त्या वस्तूला खूप जपतो.मग आपण एक झाड जर त्याला या दिवशी भेट म्हणून दिलं तर त्या झाडाला ती व्यक्ती आपल्या जीवापाड जपेल आणि ते झाड हमखास जगणार.अशा प्रकारचा संकल्प करून हजारो झाडें लावण्याचं काम जर प्रत्येक गावातील तरुणांनी केले तर भविष्यात देश सुजलाम सुफलाम होऊन पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.आज धावडेवाडी येथे वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या संकल्पनेतून वृक्षलागवड उपक्रमास अनुसरून "वाढदिवस तुमचा झाड आमचे " याप्रमाणे वाढदिवस साजरा व्हावेत असे ते म्हणाले यावेळी यशस्वी उद्योजक किरण कोतकर,धावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांमध्ये मा.सरपंच संजयकुमार कोतकर,मा.उपसरपंच सुनील भापकर, सोसायटी चेअरमन ॲड.चंद्रकांत निकम,संदीप भापकर,व्हा.चेअरमन शिवनाथ कोतकर,युवा उद्योजक किरण कोतकर, युवा उद्योजक रावसाहेब कोतकर,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब जावळे, विकास शिर्के,दिलीप धावडे,संतोष किसन चौधरी (नायब सुभेदार), दादासाहेब किसन चौधरी मेजर,बाबासाहेब रामचंद्र धावडे (ASI),अंबादास धावडे, मारुती धावडे (मा. सचिव वन समिती), राजेंद्र धावडे (मा.व्हा चेअरमन) रघुनाथ धावडे.मा.अध्यक्ष वन समिती स्व.परसराम(तात्या) धावडे फाउंडेशन.धावडेवाडी युवा प्रतिष्ठान चे सर्व सभासद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष