देशमुखवस्ती आदर्श शाळेत सैनिक माता - पित्यांचे हस्ते ध्वजारोहन

By : Polticalface Team ,Tue Aug 16 2022 21:52:08 GMT+0530 (India Standard Time)

देशमुखवस्ती आदर्श शाळेत सैनिक माता - पित्यांचे हस्ते ध्वजारोहन श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील देशमुखवस्ती आदर्श शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सैनिक मेजर बापूसाहेब वाबळे यांचे माता - पिता शिरसगावचे मा. सरपंच बबनराव वाबळे व सौ मंगलताई वाबळे तसेच दिवंगत मा. सैनिक अशोकराव जाधव यांच्या वीरपत्नी नंदाताई जाधव यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर देणगीदार रंगनाथ देशमुख होते. भारतीय स्वातंत्र्य हे त्याग व बलिदानाचे प्रतिक आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी व भारतीयांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी अनेक वीरांनी देशासाठी आत्मबलिदान केले. अनेकांनी हौतात्म्य पत्कारले. आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात आपला देश अनेक बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. तसेच शिक्षण, तंत्रज्ञान, सांस्कृतिक वारसा याबाबतीत पुढे आहे. देशातील शहरे, गावे, सरकारी शाळादेखील आज डिजिटल झाली आहेत. आपल्या शाळेला ग्रामस्थांनी दिलेल्या लोकसहभागामुळेच जिल्ह्यातील सर्व मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात आपली शाळा इतरांसाठी रोल मॉडेल स्कूल असणार आहे, हे ग्रामस्थ, पालक यांच्या अनमोल सहकार्यामुळेच शक्य झाले असे गौरवोद्गार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक रामदास ठाकर यांनी काढले. तीन दिवस सर्व ग्रामस्थांनी घरोघरी हर घर तिरंगा अभिमान राबवत सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकावला. तसेच शालेय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्यक्रमात लोकसहभाग देणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास शिरसगावच्या सरपंच शारदाताई सतीश जाधव, पिंप्री चिंचवड महानगरपालिकेचे मा. नगरसेवक अशोकराव कुलांगे, मा. सरपंच तेजमल धारकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव सोमवंशी, उपाध्यक्ष शाहनूर सय्यद,मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर गुणवरे, दिलावर सय्यद, उपाध्यक्ष केशवराव वाबळे, संतोष पठारे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय ढवण,पारनेर सैनिक बॅकेचे राजाराम ढवण, न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशिल शिक्षक शंकर यदलोड, श्रीगोंदा शुगर शाळेच्या अध्यक्षा कल्पनाताई कांबळे, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष संभाजी ढवण, शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ पाटोळे, दत्तात्रय नागवडे, तुकाराम उंडे, महादेव ढवण, जयसिंग गायकवाड,याकूब इनामदार,चंदर जगताप, दत्तात्रय मांडे,दादासाहेब चौधरी, रामचंद्र भगत,रामदास लगड,व्यवस्थापन सदस्य रमेश गायकवाड, अमित जाधव, प्रकाश वाबळे, प्रशांत जाधव,राहुलराजे निंबाळकर, विठठल गलांडे, योगेश जाधव,अनिलराव सोमवंशी, शरीफभाई शेख,बजरंग गिरे, शामराव काकडे, मिठूभाई शेख, नवनाथ उंडे, शरद मांडे, राजेंद गोरे, भाऊसाहेब गायकवाड, मनोज गोरे, माऊली देशमुख, संकेत नागवडे, हनुमंत गायकवाड, सुनिल उंडे,सोमवंशी, सुरेखा गलांडे, सेविका वैशाली देशमुख, तसेच वाबळे व जाधव कुटूंबातील सर्व सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. आभार शाळेचे अध्यक्ष शंकरराव सोमवंशी यांनी मानले. ग्रामपंचायत शिरसगाव बोडखा, सिदधीविनायक फौंडेशन तसेच रामचंद्र भगत, दिलावर सय्यद, संभाजी ढवण, तसेच ग्रामस्थ यांचेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष