श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात शंभर वर्षाच्या वीर जवान पत्नी जिजाबाई कुरुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

By : Polticalface Team ,Wed Aug 17 2022 19:00:51 GMT+0530 (India Standard Time)

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात शंभर वर्षाच्या वीर जवान पत्नी जिजाबाई कुरुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वीर जवानांच्या पत्नी जिजाबाई माधवराव कुरुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. दरम्यान लिंपणगाव येथील वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव गोविंद कुरुमकर हे देश स्वतंत्र्यापूर्वी 1917 रोजी सैन्य दलात भरती झाले. त्यावेळी देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. 1945 रोजी दुसरे महायुद्ध झाले होते. त्या महायुद्धात वीर स्वातंत्र्य सैनिक माधवराव कुरुमकर शौर्य गाजवत युद्धामध्ये सहभाग घेतला होता. अशा या प्रतिकूल परिस्थितीत वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांनी देशाची जवळपास 24 वर्षे सेवा केली. आपल्या भारत मातीशी प्रामाणिकपणे राहून कुरुमकर यांनी देश सेवेसाठी यांनी अहोरात्र सैन्य दलात उत्कृष्टपणे कामगिरी बजावली होती. त्यांचे गाववासीयांना स्मरण होणे सहाजिकच असल्याने सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बिभिशन नागवडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांच्या पत्नी जिजाबाई कुरुमकर वय 100 वर्ष यांना स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण देऊन ध्वजारोहणास उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनी देखील ती मान्य करत ध्वजारोहणास उपस्थित राहिल्या. याप्रसंगी जेष्ठ माता जिजाबाई कुरुमकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यापूर्वीची गाथा पती स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांनी सैन्य दलात काम करतानाच्या आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या की, ब्रिटिशांच्या काळात सैन्य दलात काम करताना त्याकाळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, वाहन व्यवस्था व यंत्रसामग्री नव्हती. शत्रूशी लढताना अक्षरशः पायपीट करावी लागत होती. जेवणही वेळेत मिळत नसे. परंतु देश सेवेचा अभिमान व कर्तव्य म्हणून देशाचे रक्षण करताना अक्षरशा डोळ्यात तेल घालू शत्रूशी लढावं लागत होत. पुढे दुसऱ्या महायुद्धात मोठे योगदान देऊन गाजवलेले शौर्य याविषयी त्या गहिवरून आल्या. त्या काळी ब्रिटिश सरकारने सैन्य दलात काम करणाऱ्या जवानांना दिलेली वागणूक या सर्व बाबी अंगावर शहारे आणण्यासारखे होत्या. अशा परिस्थितीत मी माझ्या सासरी सासू, सासरे, दीर, मुला बाळांचे संगोपन, करत संसार चालवला. पती प्रतिकूल परिस्थितीत देश सेवेत सैन्य दलात काम करंत असताना मी खंबीरपणे कुटुंब प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी समर्थपणे चालवली. अशा थरारक आठवणी एका ज्येष्ठ माता वीर जवान पत्नी जिजाबाई कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्या. या ध्वजारोहण सोहळ्यास वीर जवान माधवराव कुरुमकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र हरिभाऊ कुरुमकर, सोपानराव कुरुमकर, गावच्या सरपंच शुभांगीताई जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर, सेवा संस्थेचे चेअरमन रवींद्र खळतकर, व्हाईस चेअरमन मधुकर होले, संस्थेचे सर्व आजी-माजी संचालक भाजपा नेते नंदकुमार कोकाटे यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व आजी-माजी सदस्य विद्यार्थी ग्रामस्थ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन एम मोळक त्यांचे सर्व शिक्षक तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक शिवाजीराव नागवडे यांनी केले. तर आभार एस पी जगताप यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.