संजीवनी विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन उत्साहात साजरा , मराठी सिनेतारकांची प्रमुख उपस्थिति
By : Polticalface Team ,Wed Aug 17 2022 19:04:07 GMT+0530 (India Standard Time)
संजीवनी प्रतिष्ठान संचालित संजीवनी विद्यालय बौद्धिक अक्षम मुला मुलींची शाळा हडपसर पुणे या ठिकाणी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सैराट चित्रपटातील सल्याची भूमिका साकारणारे अभिनेते अरबाज शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर लोकसंगीताचा वारसा जपणारे गायक व संगीतकार अमर पुणेकर यांच्या हस्ते थोर महापुरुष यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक लालासाहेब शेख, संगीतकार प्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आशिष फुले, मुकेश खोत, पवन शिरोडे व जालिंदर राऊत उपस्थित होते. बौद्धिक अक्षम मुलांसाठी मनाचा कल लक्षात घेऊन मुलांना शिक्षण अधिक आनंददायी व्हावे हेच पालक व शिक्षकांचे उद्दिष्ट असले पाहिजे असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष इनायत शेख यांनी पाहुण्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुभाष पिरगळ आणि शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
वाचक क्रमांक :