तीन एके-47 सह रायगडमध्ये आढळलेल्या संशयास्पद बोटीचे गुढ उकलले

By : Polticalface Team ,Thu Aug 18 2022 17:47:30 GMT+0530 (India Standard Time)

तीन एके-47 सह रायगडमध्ये  आढळलेल्या
 संशयास्पद बोटीचे गुढ उकलले रायगड : रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली होती. या दोन संशयास्पद बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. बोटींमध्ये शस्त्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे. एका मच्छिमाराने मुंबई पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आता राज्यसरकारकडे या संशयास्पद बोटी संदर्भातील माहिती आली आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशना दरम्यान दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडी हान असून तीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडर्स गन या महिलेची आहे. तीचे पती जेम्स हार्बर्ट हा या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहून यूरोपला जाणार होती. 26 जूनला या बोटीचे इंजिन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला त्यानंतर एका कोरियन युद्धनौकेने त्यांची सुटका केली, त्यांना ओमानला सुपुर्द केले. मात्र समुद्र खवळलेला असल्याले बोटीचे नेतृत्व करता आले नाही आणि ती भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली आहे. अशी माहिती भारतीय कोसगार्डने दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यात फक्त हत्यार होते. बोट कुठून आली आणि त्यात कोण सामील होऊ शकतो, याबाबतचा तपास एटीएसचे पथक करू शकते. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. तसेच मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले स्फोटक देखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष