लहुजी आर्मीच्यावतीने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले.

By : Polticalface Team ,Fri Aug 19 2022 19:35:47 GMT+0530 (India Standard Time)

लहुजी आर्मीच्यावतीने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले. दिनांक १९ ऑगस्ट: लहुजी आर्मी संघटनेच्यावतीने मातंग समाजाच्या मागण्यासाठी आजाद मैदान येथे मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी मातंग समाजावर होणारे अन्याय-अत्याचार तात्काळ थांबविण्याकरिता सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून जलदगतीने न्यायालयात कार्यवाही करावी, पानशेत पूरग्रस्त मागासवर्गीय सहकारी संस्थेतील मातंग समाजाच्या मूळ पूरग्रस्त व त्यांच्या वारसांच्या प्रलंबित मागण्याची तत्काळ दाखल घ्यावी, क्रांतीवीर लहजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने करण्यात आलेल्या ६८ शिफारशीची महाराष्ट्र शासनाने खातेनिहाय आदेश काढण्यात यावा, केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाच्या जमिनीवर टाकण्यात आलेले आरक्षण हे आर्ट आणि गॅलरी ऐवजी स्मारक असे करावे, मातंग समाजाच्या मालकीच्या एक किवा दोन गुंठे जमिनीचा ८४ क शेरा विना नजराणा घेता कमी करण्यात यावा, कोरोनाच्या महामारीमुळे बाधित झालेल्या आणि ज्यांचे सिबिल(cibil) चे आकडेवारी कमी झाली आहे त्या मातंग तरुण-तरुणी साठी उद्योग-धंद्याचे कला-कौशल्यचे प्रशिक्षण देवून विना सिबिल(cibil) ची आकडेवारी ग्राह्य धरून कर्ज उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात यावी, अनुसूचित जाती व जमाती करिता असलेल्या एकत्रित आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे लोकसंखेनुसार वर्गवारी करण्यात यावी. या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात लहुजी आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अंबादास सूर्यवंशी म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान न्याय व हक्क दिला आहे. त्याच बरोबर मुलभूत अधिकार हि दिले आहे. संविधानात अनुक्रमे भाग ३ आणि ४४ असा त्याचा क्रम आहे. संविधानाच्या उद्देशपात्रिकेत सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच दर्जाची व संधीची समानता करून देण्याची हमी देण्यात आली आहे. परंतु आज एकविसाव्या शतकातही मातंग समाज विकासापासून वंचित आहे. देशाला स्वातंत्र मिळून आजतागायत ७५ वर्ष झाली. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याने अनेक मुलभूत समस्या आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये अशिक्षितपणा, दारिद्र, बेरोजगारी, अन्याय अत्याचार, व्यसनधीनता आणि गुन्हेगारीचा समावेश आहे. मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. लोकशाही मध्ये मागण्या मान्य करण्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहे. मागण्या मान्य न झाल्यास मातंग समाज राज्यभर तीव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलनाला प्रभाकर इंगळे, गोपीनाथ कांबळे, नरसिंह सूर्यवंशी, मुकेश जाधव, परशुराम भवाल, दिलीप खुडे, किशोर खुडे, मोहन खिल्लारे, विशाल ढावरे, सागर वायदंडे, कविता ननावरे, माया वायदंडे, कमल बागाव, वर्षा खुडे, अश्विनी अवघडे, मीरा आरडे, नंदा शिंदे, मंदा शिंदे, उज्जवला गिरे, तानाजी दाकले, प्रशांत अस्वरे, रमेश राजगुरू आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष