जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक, दौंड मधिल विविध संघटना आक्रमक, 

By : Polticalface Team ,Sat Aug 20 2022 12:26:31 GMT+0530 (India Standard Time)

जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक, दौंड मधिल विविध संघटना आक्रमक,  

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड दि.१९/ऑगस्ट २०२२,रोजी दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून जिल्हा संघटक भरत भुजबळ व जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका, सारिका ताई भुजबळ तसेच विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यवत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल जगताप, ठाणे अंमलदार नारायण जाधव यांना लेखी निवेदन देऊन, मानवतेला कलंकित करणाऱ्या या हत्याकांड घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला, राजस्थान राज्यातील जालोरमध्मे शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या ९ वर्षाच्या दलित विद्यार्थ्यांने सवर्णासाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिला या कारणावरून जातियवादी शिक्षकिने अत्यंत क्रूरपणे मारहाण करुन चिमुकल्या विद्यार्थ्याला जीवे ठार मारले या घटनेचा देशात व महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, दौंड तालुक्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्ण व्यवस्था व जातीवादी प्रवृत्ती विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे, भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय दि,१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा, राष्ट्रीयध्वज उभारून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मात्र या देशातील वर्ण व्यवस्था संपुष्टात येत नाही, अस्पृश्यता मानसाच्या मनात रुतुन बसली आहे हिच मोठी शोकांतिका ? शिक्षकाचे कर्तव्य विसरून गेलेला सुशिक्षित नागरिक जर जाती पातीच्या विषारी नागाला दूध पाजीत असेल तर या नागाचे शिर टेचण्याची वेळ येऊन ठेपली आहे ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला हि मानवतेला काळीमा फासणारी वृत्ती चा नायनाट करावा लागणार आहे, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हा लढा तेवत ठेवण्यासाठी पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत, असे स्पष्ट मत संभाजी ब्रिगेड, झोपडपट्टी सुरक्षा दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रयत शेतकरी संघटना, अखिल भारतीय समता परिषद, यशवंत शेना, वंचित बहुजन आघाडी, मातंग नवनिर्माण सेना, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी तीव्र विरोध दर्शवित मनोगत व्यक्त केले आहे, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सर्व धर्म समभाव, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, फक्त विचार करुन चालणार नाही तर तो प्रत्येकाने अंगीकार करणे आवश्यक असल्याचे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले, वर्ण व्यवस्था जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देशातील नागरिक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ समजू शकले नाहीत, प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात आले आहे मात्र या हत्याकांड प्रकरणी व्यक्तीला स्वतंत्र असल्याचा फक्त भास होत आहे की काय हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे, राजस्थानच्या जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकल्या दलित विद्यार्थ्यांला आपला जीव मगवावा वागतो हि बाब अतिशय निंदनीय आहे, केवळ या ९ वर्षाच्या चिमुकल्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या कारणावरून शिक्षिकाने रागातून केलेली निर्घृण हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक आहे. या अमानुष जातीवादाचा तीव्र निषेध करीत, मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्हा व दौंड तालुका विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे, वर्णव्यवस्थेचे विषारी विचार देशातील मानवतेला कलंकित करत आहेत, त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, याचा विचार बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीला करावाच लागणार आहे, समाजातून वर्णव्यवस्था हद्दपार व्हावी, उच निच खालचा वरचा जाति भेदभाव नष्ट केला पाहिजे. असे मत विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केली, या वेळी, अंकुशराव हंबीर, मंगेश रायकर, दत्ता डाडर, अनिल गायकवाड, बबनराव गायकवाड, डॉ संतोष बेडेकर, उमेश म्हेत्रे, काळुराम शेंडगे, बापु मोरे, किशोर वचकल, अदी मान्यवर उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.