आमदार मंगेश, कधी म्हैस पाहिली होती का?
By : Polticalface Team ,Sun Aug 21 2022 13:19:20 GMT+0530 (India Standard Time)
जळगाव : राज्यात शिंदे-फडणवीस यांचं एकत्रित सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघातील त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा होत्या. पण दूध संघात शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळांनी 10 कोटींचा निधी परस्पर खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
यावर खडसे प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींशी बोलताना म्हणाले, मंगेश चव्हाणने कधी म्हैस पाहिली होती का? मंगेश चव्हाण ला विचारा काय होता अगोदर. 2014 ला दलाली करायचा कुठून आला इतका पैसा? माझ्या बापजाद्याची मालमत्ता होती.
दूध संघाचा कधी अनुभव आहे का? दूध संघातील प्रशासक मंडळातील बऱ्याच सदस्यांचा दूध व्यवसायाशी संबंधच नाही. निवडणुकीच्या काळातच भ्रष्टाचार आठवतो, इतर वेळी कुठे जातात. संधी मिळाली तर अधिवेशनात आवाज उठवणार. मी एकटा लढणार आहे, माझ्यामागे मुक्ताईची शक्ती आहे.
केंद्र शासनाची 50 टक्के सबसिडी होती आणि 50 टक्के अल्पदराचे कर्ज आणि त्याला राज्य सरकारची हमी होती. NDDB मार्फत संपूर्ण राबविण्यात आले. पैसे वितरण करण्याचे आदेश समितीला राज्य सरकारने दिले होते. मंदाकिनी खडसे त्यात संचालक होत्या. अध्यक्ष व इतर व्यक्ती शासकीय सदस्य होते.
समितीला NDDB च्या खर्चाला मान्यता देण्याचे अधिकार होते. दूध संघाचा त्यात दुरान्वये संबंध नाही. 2018, 19, 20, 21 या काळात प्रत्यक्ष खर्चात वाढ झाली. तेव्हा जीएसटी नव्हता नंतर त्याची वाढ झाली, किमती वाढल्या. वाढीव किमतीला मान्यता द्यावी यासाठी प्रकल्प समितीने प्रस्ताव तयार करून DDR ला पाठवला.
तो विभागीय संचालकांना पाठवला. दोघांनी शिफारस केली. प्रस्ताव मंत्रालयात गेला. मंत्री सुनील केदार यांनी गेल्या महिन्यात त्यास मान्यता दिली. शासन आदेश निर्गमित करण्यापूर्वी नवीन सरकार आले आणि त्यांनी जुन्या आदेशांना स्थगिती दिली, त्यात याचा देखील समावेश होता.
अर्धवट माहितीच्या आधारे नोटीस देण्यात आली. शासन बदलले आणि तात्काळ प्रशासक मंडळाची नेमणूक झाली. लागलीच चौकशी आदेश निघाले आणि वसुलीची कार्यवाही सुरू झाली.
प्लांट मध्ये महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आला. संचालक मंडळाला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण सुरू आहे. पारदर्शी काम सुरू आहे. दुसरे काही शोधा, किती बदनाम करणार! असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. दूध संघाला १०० कोटी आणल्यास सागर पार्कवर आरती ओवळणार, असे खडसे यांनी जाहीर केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.