अपघातात पतीचा घटनाथळी तर पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू नगर - दौंड रस्त्यावरील घटना.
By : Polticalface Team ,Mon Aug 22 2022 16:00:31 GMT+0530 (India Standard Time)
नगर दौंड रस्त्यावर पुन्हा एकदा अपघात दोन ठार , एक जखमी अपघातात पती - पत्नी ठार , अपघाताची मालिका थांबेना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील कन्हेर मळा नजीक झालेल्या अपघातात पतीचा घटनास्थळी तर , पत्नीचा उपचार घेत असताना दवाखान्यात मृत्यू झाला आहे . या गंभीर अपघातात एक जनाची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रथमदर्शी माहिती मिळत आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की , दुचाकी पंक्चर झाल्यामुळे पायी उतरून गाडी ढकलत चाललेल्या पती , पत्नी सह एका व्यक्तीला पाठीमागच्या बाजूने येऊन एका टेम्पोने जोराची दिल्यामुळे पतीचा घटनास्थळी तर पत्नीचा नगर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे . यात एक जन गंभीर जखमी झाल्याची श्रीगोंदा । तालुक्यातील दौंड नगर रस्त्यावर धडक घटना कोळगाव नजीक लगड वस्ती परिसरात आज सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे . संभाजी मानसिंग मोहिते अंदाजे वय ५० व त्यांच्या पत्नी प्रियंका संभाजी मोहिते रा दौंड यांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला . सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास मोहिते पती टेम्पोने या रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या तीन व्यक्तींना जोराची धडक दिली . त्यात मोहिते यांच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला . मार या घटनेनंतर टेम्पो चालक टेंपो सोडून पळून गेला . बेलवंडी पोलीस घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्तांना तात्काळ त्यांनी उपचारासाठी दवाखान्यात पाठवले . मात्र , दुर्दैवाने यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .. दौंड रस्त्यावर दौंडच्या दिशेने जात असताना त्यांची दुचाकी पंक्चर झाली . त्यामुळे ते दोघे पती पत्नी दुचाकी ढकलत जात असताना , दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अपघात झाले असून अनेक माणुसकी दाखवत तुम्ही आमच्या दुचाकीवर जा .. आम्ही तुमची गाडी घेऊन येतो . अशी बातचीत केली . त्याचवेळी पाठीमागून नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका जणांना जीव गमावा लागला तर काही जण कायमचे जायबंदी झाले हा रस्ता अजून किती बळी घेणार ? नगर दौंड रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे .
वाचक क्रमांक :