डॉक्टर संतोष साळुंके यांची पशुचिकित्सा व्यवसाय संघटनाच्या महा.राज्य अतिरिक्त मुख्यालय सहसचिव पदी निवड
By : Polticalface Team ,Wed Aug 24 2022 09:19:22 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा येथील असणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी-२ देवदैठण पशुवैद्यकीय डॉक्टर संतोष साळुंके यांची पशुचिकित्सा व्यवसाय संघटनाच्या महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्यालय सहसचिव पदी नुकतीच निवड झाली आहे.पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे च्या वतीने नियुक्त राज्य कार्यकारीणी निवडणुक समिती मार्फत घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारणी निवडणुक सन २०२२-२०२७ मध्ये मा.डॉ.संतोष कचरु साळुंके यांची अतिरीक्त मुख्यालय सहसचिव
या पदावर निवड करण्यात आली आहे.निवडीचे यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले
यावेळी डॉ.सुनिल काटकर पशुकिचिक्त्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.मारुती कानाले सचिव तसेच डॉ.ज्ञानेश्वर गांगर्डे मा. कार्याध्यक्ष डॉ.बाळासाहेब सोनावळे जिल्हा अध्यक्ष डॉ.नितीन निर्मळ जिल्हा सचिव,डॉ. चौलकर,डॉ.लांडे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या निवडीने देवदैठण,ढवळगाव पंचक्रोशी व श्रीगोंदा तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक :