By : Polticalface Team ,Wed Aug 24 2022 12:29:21 GMT+0530 (India Standard Time)
यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. तर शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एकमेकांत भिडल्याचं दिसून आले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.
यावर स्पष्टीकरण देताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले की, अधिवेशना दरम्यान तीन-चार दिवस विरोधक आम्हाला घोषणा देत गद्दार, 50 खोके एकदम ओके, पण जे आम्ही केलं नाही, ते आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याने, आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवला. मात्र दरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला.
त्याचबरोबर या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील गोंधळा अगोदर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, गद्दार, 50 खोके एकदम ओके या घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आले.
मुंबईमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरु असतानाच दररोज काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारचं पावसाळी अधिवेशन चांगलचं गाजत आहे. वाचक क्रमांक :