प्रेम संबंधातून झालेल्या वादानंतर महिलेने आयुष्य संपवलं... जिल्ह्यात येथे घडली घटना..!

By : Polticalface Team ,Wed Aug 24 2022 12:32:49 GMT+0530 (India Standard Time)

प्रेम संबंधातून झालेल्या वादानंतर महिलेने आयुष्य संपवलं... जिल्ह्यात येथे घडली घटना..! दिनांक 24 ऑगस्ट 2022, अहमदनगर: प्रियसिला बायकोने घरात घुसून मारले, माझ्या पतीशी प्रेमसंबंध ठेवले..! तर, तुझ्याकडे पाहुण घेईल..अशा प्रकारची चकमक दोन महिलांमध्ये झाली. मात्र, या वादाचा सदमा आता इज्जतीचा पंचनामा करणारा ठरल्याने.. प्रियशीने थेट पहाटे-पहाटे गावकुसाबाहेर जाऊन फाशी घेत आत्महत्या केली.

ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोगेपठार येथील साकूर शिवारात दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 38 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला.

जेव्हा घटना घडली तेव्हा त्याच परिसरात जवळ-जवळ दोन फाशीचे दोर लटकविलेले दिसले. तर, त्यातील एकाला महिला लटकलेली होती. त्यामुळे, हा फसवून घातपात तर नाही ना केला..? अशी शंका स्थानिक नागरिकांनी उपस्थित केली होती. मात्र, आठ दिवसाच्या चौकशीनंतर पोलिसांनी योग्यतो निष्कर्ष काढला. त्यानंतर मयत महिलेच्या नात्यातील व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनंतर घरात घुसून मारहाण करणे, शिविगाळ, दमदाटी करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा विविध कलमान्वये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरीफ पटेल, दादा पटेल, साहिल पटेल (रा.साकूर) यांच्यासह दोन व्यक्तींची फिर्यादीत नावे आहेत. पुढील तपास पोलीस उपाधिक्षक राहुल मदने करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी आरिफ पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) याचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर प्रेम जडले होते. पहिल्यांदा नजरानजर आणि नंतर हायबाय होऊन, हा सिलसिला पुढे चालु झाला. कालांतराने यांच्यात मैत्री आणि त्याचे रुपांतर प्रेमात परावर्तीत झाले. तसे अंतर फार काही दुर नसल्याने त्यांच्या भेटीगाठी चांगल्या रंगू लागल्या होत्या. त्या दरम्यानच्या काळात या कानाची खबर त्या कानाला नव्हती. त्यामुळे, ती तिच्या घरी नवरा आणि कुटुंबापासून चोरुन लपून आपले प्रेम व्यक्त करत होती. तर, हा पटेल देखील न पटेल असे कृत्य घरच्यांच्या त्रयस्त करीत होता.

मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेख झाला... की, त्याची फळे भोगावीच लागतात. त्यामुळे, पटेल व त्यांच्या प्रियसिच्या कहाण्या हळुहळू बाहेर पडू लागल्या होत्या. त्यामुळे, कानोकानी ख़बर पटेल यांच्या घरापर्यंत गेली. आणि नको तो राडा होऊन बसला. ज्यामुळे, संपुर्ण कुटूंबाला आता जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. तर, एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला.

दरम्यान, पटेल आणि त्याच्या प्रियसिच चर्चा गावभर पसरली आणि ती पटेल याच्या पत्नीसह कुटुंबाला काही सहावेना. त्यामुळे, घरातील पाच जणांनी थेट प्रियसिचे घर गाठले. दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पटेल कुटुंबियांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. तर, मी एक विवाहित स्त्री आहे, तू देखील आहेस. असले उद्योग करणे चूक आहे. का उगच दोघांचा संसार उध्वस्त करते. अशा प्रकारे त्यांच्यात चर्चा आणि बाचाबाची झाली. परंतु, प्रकरण नाजूक असल्यामुळे दोघींनी एकमेकींवर तोंडसुख घेतले. अर्थात या गोष्टी होणे सहाजिक आहे.

मात्र, या प्रेमाचा शेवट असा होईल याची कोणाला कल्पना नव्हती. प्रीयसिला तिच्या घरात घुसून मारहाण करण्यात आणि तर, शिविगाळ, दमदारी करुन, धमकी देखील दिली. वाद फक्त इतकाच होता. की, तुमचे प्रेम संबंध तोडा आणि आपापल्या वाटा वेगळ्या करा. त्यानंतर वाद मिटत होता. दरम्यान, आपल्या घरात घुसून आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. आपल्या समाजात सर्वांना माहित झाले, समाज काय म्हणेल..? कुटुंबाला कसे तोंड द्यायचे.? उद्याच्या भविष्यात हे दाग पुसतील का.?

झालेल्या वादनंतर मयत महिला प्रचंड अस्वस्थ होती. तिने त्यानंतर स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय घेतला. एक दोरी घेऊन महिलेने स्वतःला संपवून घेतले. त्यानंतर सकाळी साकूर ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असणाऱ्या एका झाडाला एके प्रेत लटकताना दिसले. त्यानंतर घडलेला घटनाक्रम समोर आला. परंतु, महिला झाडावर चढली कशी ? दोर बांधला कसा आणि आत्महत्या केली कशी..? असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. तर, जवळच एका झाडावर देखील दुसरा दोर लटकलेला होता. त्यामुळे तेथे काही संशयित बाबी निदर्शनास येत होत्या. परंतु, प्रथमतः आकस्मात मृत्यूची नोंद आणि सखोल चौकशीअंती आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी 5 जणांवर गुन्हा नोंदविला आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.