अमोल गायकवाड यांची नाभिक महामंडळाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संघटक पदी व जीवन राऊत यांची बारामती तालुका उपाध्यक्षपदी निवड
By : Polticalface Team ,Thu Aug 25 2022 09:46:17 GMT+0530 (India Standard Time)
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ह भ प नितीन महाराज काशीद यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकर येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संत सेना महाराज समाधी सोहळा दुपारी १२.०० वाजता पार पडला. त्यानंतर महाप्रसाद आयोजन संत सेना महाराज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराजे राजेनिंबाळकर ,वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच जीवन बनकर ग्रामपंचायतचे सदस्य मोहन बनकर ,अजित भोसले,प्रमोद किर्वी, संतोष दरेकर नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव रामचंद्र गायकवाड,नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील जगताप, बारामती तालुकाध्यक्ष गणेश काशीद,पश्चिम महाराष्ट्राचे सदस्य राधेश्याम साळुंखे पुणे जिल्ह्याचे सल्लागार ज्ञानदेव राऊत उपस्थित होते. यावेळी वडगाव निंबाळकर येथील पत्रकार अमोल गायकवाड यांची नाभिक महामंडळाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संघटक पदी व जीवन राऊत यांची बारामती तालुका उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव रामचंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
वाचक क्रमांक :