दिल्ली येथे जेऊर रेल्वे स्टेशन येथे हुतात्मा कन्याकुमारी व उद्यान एक्सप्रेस थांबवण्याची कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांनी केली मागणी
By : Polticalface Team ,Thu Aug 25 2022 19:41:20 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस थांबवण्यात यावी अशी मागणी कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांनी स्वतः दिल्ली येथील रेल भवन येथील रेल्वे डेप्युटी डायरेक्टर अमितजी श्रीवास्तव यांना निवेदन दिले
श्रीवास्तव यांना दिलेल्या निवेदनात श्री सरडे यांनी पुढे असे म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यातील जेऊर हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्टेशन आहे या भागातूनच करमाळा तसेच परंडा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून जेऊर रेल्वे स्टेशन येथून मुंबई पुणे हैदराबाद कन्याकुमारी या ठिकाणी प्रवासी येजा करतात सोलापूर जिल्ह्यातील जेऊर हे रेल्वे स्टेशन मध्यवर्ती ठिकाणाचे असून हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देणारे आहे तेव्हा या ठिकाणी हुतात्मा कन्याकुमारी व उद्यान एक्सप्रेस हे महत्त्वाचे गाड्या जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात याव्या अशी मागणी श्री सरडे यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे
कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांनी स्वतः दिल्ली येथील रेल भवन येथील रेल्वे डेपोटी डायरेक्टर अमितजी श्रीवास्तव यांना स्वतः भेट घेऊन सदरचे निवेदन दिले आहे
वाचक क्रमांक :