सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री लगड यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवला राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,Fri Aug 26 2022 22:35:21 GMT+0530 (India Standard Time)

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री लगड यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवला राजेंद्र दादा नागवडे लिंपणगाव( प्रतिनिधी) सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बबनराव लगड यांनी 34 वर्ष ज्ञानदानाचे काम करत असताना प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांवर संस्कार करत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवला, असे गौरवदगार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी आयोजित कार्यक्रमात काढले. श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय पिंपळगाव पिसा या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बबनराव पांडुरंग लगड हे 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा ग्रामस्थ शिक्षण संस्था व विद्यालयाच्या वतीने सप्तनीक नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे होते यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले की जुन्या काळात शिक्षण संस्था उभ्या करून चालवणे हे मोठे जीकिरीचे व कठीण काम होते. अशा परिस्थितीत सहकार महर्षी बापूंनी खेडोपाडी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावोगावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या ज्ञानगंगा उभारल्या. त्याकाळी बापूंच्या खांद्याला खांद्या लावून अनेक कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले. व सहकार्य केले. सद्यस्थितीला या शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 16 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे केवळ बापूंच्याच दूरदृष्टीमुळे शक्य झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ झालेले दिसतात. त्याबरोबरच शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक उत्तम प्रकारे अध्यापनासह वेगवेगळे उपक्रम राबवून त्याद्वारे शिक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी देश व राज्य पातळीवर चमकले आहेत. ही मोठी अभिमानाची बाब आहे. या शिक्षण संस्थेत श्री बबनराव लगड यांनी देखील संस्थेच्या वाटचालीमध्ये भरीव योगदान दिले. आम्ही देखील संस्थाचालक म्हणून या विद्यालयासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली. असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, श्री लगड यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहताना उत्तम प्रकारे प्रशासन संभाळले. आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, दोन्हीही शिक्षण संस्थेत जवळपास 25 शिक्षक कमी आहेत. त्यामुळे अध्यापन करताना अडचणी येत आहेत. शासनाने भरती प्रक्रिया सुलभ करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून श्री लगड यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गौरव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी श्री नागवडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, मुख्याध्यापक बबनराव लगड यांनी 3४ वर्षे ज्ञानदान करात असताना बापूंनी घालून दिलेले विचार व संस्कार या संस्कारातून उत्तम विद्यार्थी घडविण्येाचे काम केले. सहकार महर्षी बापूंनी मोठ्या दूरदृष्टीने शिक्षण संस्था उभ्या करून सर्वसामान्यांच्या मुलांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी योगदान दिले. शिक्षणामुळे उत्तम पिढी घडविण्याचे धोरण बापूंचे होते. शिक्षकांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना त्यांचे पुढील आयुष्यासाठी शिक्षकांची तळमळ असते. ही अभिमानाची बाब आहे. असे सांगून श्री भोस यांनी श्री लगड यांना पुढील दीर्घायुष्यासाठी शुभकामना दिल्या. याप्रसंगी नागवडे कारखान्याचे तज्ञ संचालक बंडोपंत पंधरकर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, हेमंत नलगे, माजी मुख्याध्यापिका सुरेखा शिर्के, पुरुषोत्तम लगड, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव पंदरकर आदींनी श्री लगड यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गौरव करत शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सत्कारमूर्ती मुख्याध्यापक बबनराव लगड यावेळी म्हणाले की, 1987 मध्ये बापूंच्या कृपा आशीर्वादाने शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ज्ञानदान करताना उत्तम विद्यार्थी व विद्यालय व संस्थेच्या नावलौकिकासाठी प्रामाणिकपणे ज्ञानदान केले. सहकार महर्षी बापूंच्या विचाराशी जुने जाणकार मंडळींनी या विद्यालयाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यामुळे या विद्यालयाचा परिसर निसर्गरम्य व सौंदर्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली असे सांगून ते पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी या विद्यालयाच्या स्थापनेसाठी मोठे परिश्रम घेऊन अडचणी सोडवल्या. आता नागवडे कारखान्याचे राजेंद्र दादा नागवडे हे देखील विद्यालयाच्या अडचणी प्रसंगी ठामपणे उभे राहतात. बापूंची शिक्षण संस्थेबाबत विचारसरणी व उत्तम शिक्षणाचे धोरण आम्ही प्रभावीपणे राबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो. असे सांगून या सेवा कालावधीत शिक्षण संस्था व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभल्याचे सांगून सत्काराबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमास दिनकरराव पंधरकर, संचालक बंडूपंत पंदरकर, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, पुरुषोत्तम लगड, संचालक श्रीनिवास घाडगे, रंगनाथ कुताळ ,सचिन कदम, रामदास कुताळ मा कॅप्टन पांडुरंग लगड, ह भ प बाळासाहेब शितोळे, विश्वास थोरात, किशोर पंधरकर उद्योजक बापूसाहेब लगड, तात्या देवकाते, संजय पंदरकर, अमित लगड, आदी सह आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक कोळगाव व पिंपळगाव पिसा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक बी डी लष्कर यांनी केले .सूत्रसंचालन अशोक आळेकर व डॉ चंद्रकांत पंधरकर यांनी केले. तर आभार उपशिक्षक झेंडे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.