By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 08:28:47 GMT+0530 (India Standard Time)
यावेळी बोलताना डॉ. प्रणोती जगताप यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात केंद्राचा ७५ तर राज्याचा २५ टक्के निधी देते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे. कोरोनाच्या महामारीतही बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्ष्मीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येऊन मास्क तयार करणे आणि नवनवीन वस्तू तयार करण्याचे काम करत आहे. यामुळे या दिवसातही त्यांना नवी उमेद मिळाली आहे.
तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे.यामुळे या महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे महिलांना योग्य तो रस्ता दाखविणारे अभियान आहे. महिलांनी आपले स्थान उंचविण्यासाठी आत्मविश्वास वाढविण्यासाठी दोन पावले टाकायचे आहेत कारण आपण पाहत आहोत आज स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. आज गावच्या सरपंच यापासून ते राष्ट्रपती पदांपर्यंत महिला जाऊन पोहोचले आहेत आपल्या महिलांना या उमेद अभियाना ने खरच सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे त्याच सोन करायला काहीच हरकत नाही.या कार्यक्रमामध्ये उमेद योजनेची माहिती सांगून महिलांना बचत गट स्थापन करण्याचे ठरले त्यानुसार खरातवाडी येथील 140 पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती दर्शविली आणि उमेद योजनेमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचा विकासास हातभार लावण्याचे ठरविले. यावेळी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, सी आर पी शीतल शिर्के आणि प्रभाग समन्वयक यांनी बचत गटाचे फायदे समजावून सांगून जास्तीत जास्त गट स्थापन करण्याचे अवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी बापूराव शेंडगे, किसन इथापे, सुरेश भापकर, बाजीराव इथापे, बाबा महाराज इथापे, दत्तू इथापे, तात्या इथापे, संतोष खरात, संभाजी खरात,सुनील इथापे, दत्तात्रय सिताराम इथापे, गणेश इथापे,भानुदास भापकर, भास्कर गोरे, बाळासाहेब इथापे, नाना इथापे, बंडू पारखे, बाळू खरात, शरद इथापे, संजय फराटे, अशोक मोरे, चंद्रकांत भापकर, अंगद पुराणे, भाऊसाहेब खरात आणि विकास राजेभोसले आदी उपस्थित होते. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष